
Happy Raksha Bandhan 2024 Wishes: रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीमधील प्रेम, आपुलकी आणि माया वाढवतो. या दिवशी बहिणी तिच्या लाडक्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते. भावाला राखी बांधून बहीण त्याच्या उदंड आयुष्यासाठी, त्याच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ-बहिणीमध्ये कितीही भांडण झाले तरी त्यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम असते. यंदा रक्षाबंधनाचा (Happy Raksha Bandhan) सण सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पण काही कारणास्तव रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या भावा-बहिणीपासून दूर असाल तर निराश होऊ नका. यामुळे तुमच्या दोघांमधील प्रेम-माया कधीच कमी होणार नाही. पण दूर असलेल्या भाऊ-बहिणीच्या चेहऱ्यावर हासू आणण्यासाठी, तुमची त्यांच्याबाबत असलेली माया व्यक्त करण्यासाठी खास मेसेज नक्की पाठवा.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Raksha Bandhan Wishes
पक्क्या धाग्यांचे निर्मळ प्रेम म्हणजे राखी
प्रेम आणि खोडकर स्वभावाचे प्रतीक म्हणजे राखी
भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना म्हणजे राखी
बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे राखी
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024

Photo Credit: Canva
जन्मोजन्मीचे हे अतूट बंधन
प्रेम आणि विश्वासाचे
नाते अधिकच घट्ट होत जाते
जेव्हा प्रेमाचा हा धागा बांधला जातो
भावाच्या मनगटावर
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024
चंदनाचा टिळा, रेशीमचा धागा
श्रावणाचा सुगंध, पावसाचा वर्षाव
भावाची आशा, बहिणीचे प्रेम
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024

Photo Credit: Canva
आपले चेहरे फुलासारखे फुलले
दादा हे नाते जेव्हा आपल्या जीवनात आले
आंबट-गोड आठवणींची साठवण होऊ लागली
आपण दोघांनीही ही आठवणींची माळ जेव्हा विणली
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024

Photo Credit: Canva
सूर्याप्रमाणे चमकत राहा
फुलांप्रमाणे दरवळत राहा
तुझ्या ताईची हीच आहे सदिच्छा
तू सदैव खूश राहा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024

Photo Credit: Canva
रक्षाबंधनाचा सण
चौफेर आहे आनंदाची उधळण
एका धाग्यात बांधला गेलेय
भाऊबहिणीचे हे अतूट नाते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनावर भद्राकाळाचे सावट, कोणत्या मुहूर्तावर भावाला बांधावी राखी?)
गेल्या वर्षांच्या गोड साठवणी
येणाऱ्या क्षणांच्या सुंदर आठवणी
राखी, प्रेम आणि आपुलकीचा पवित्र सण
हे केवळ आपल्या हक्कांचे आहेत क्षण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024
राखीचा धागा प्रत्येक वर्षी बदलत राहो
भाऊबहिणीचे प्रेम कायम वाढत राहो
जीवनात आपण दूर राहो किंवा सोबत
यशाचा सूर्य कायम दिसत राहो
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024
(नक्की वाचा: राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती)
बहिणीकडून भावाची आशा असते राखी
प्रत्येक भावाच्या मनाजवळ असते राखी
बहिणी भावाच्या मनगटावर बांधते प्रेमाची राखी
धाग्यामध्ये बांधलेला अतूट विश्वास असते राखी
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Raksha Bandhan 2024
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world