Raksha Bandhan 2024 Recipe: भाऊबहिणीच्या सुंदर नात्याचे आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण (Raksha Bandhan 2024). सणसमारंभ म्हटले की उत्साह, आनंद आणि गोडधोड स्वयंपाक आलाच... यंदाच्या रक्षाबंधनाला घरच्या घरीच ओल्या नारळाच्या करंजीचा बेत तुम्ही आखू शकता. हा पदार्थ तयार करण्यासाठी अतिशय सोपा आणि चवीलाही अतिशय स्वादिष्ट आहे. चला तर जाणून घेऊया ओल्या करंजीची (Olya Naralachi Recipe In Marathi) सोपी रेसिपी....
करंजीसाठी लागणारे साहित्य
मैदा - एक कप
बारीक रवा - 1/4 कप
मीठ - चवीनुसार
तूप - दोन चमचे
पाणी - आवश्यकतेनुसार
(नक्की वाचा:Raksha Bandhan 2024: 90वर्षानंतर रक्षाबंधनाला जुळले आले 4 अद्भुत योग, या मुहूर्तावर राखी बांधणे ठरेल अतिशय शुभ)
सारणासाठी लागणारी सामग्री
ओले खोबरे (किसलेले) - दोन कप
गूळ - अर्धा कप
साखर - अर्धा कप
मिल्क पावडर - दोन चमचे
खसखस - आवश्यकतेनुसार
काजू /बदाम काप - एक चमचा
वेलचीपूड - अर्धा चमचा
जायफळ - चिमूटभर
तूप - एक चमचा
(नक्की वाचा:Raksha Bandhan 2024: भावाला त्याच्या राशीनुसार बांधा राखी, कोणत्या राशीसाठी कोणता रंग अतिशय शुभ आणि लाभदायक ठरेल?)
करंजी तयार करण्याची कृती (Olya Khobaryachya Karnjya Recipe)
- परातीमध्ये अथवा मोठ्या ताटामध्ये मैदा, रवा, मीठ आणि वितळवलेले तूप एकत्रित घ्या.
- पिठामध्ये गाठी होणार नाहीत, याची काळजी घ्या आणि यानंतर पाणी मिक्स करून कणिक मळावे.
- पीठ मळून झाल्यानंतर अर्धा तासासाठी झाकून ठेवावे.
(नक्की वाचा:Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat Time: रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि सणाचे महत्त्व)
- करंजीचे सारण तयार करण्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एका भांड्यामध्ये खसखस भाजून घ्या.
- त्यानंतर तुपामध्ये काजू आणि बदामाचे काप भाजा. काप व्यवस्थित भाजल्यानंतर वाटीमध्ये काढा.
- तुपामध्ये नारळाचा किस परतून घ्या आणि त्यामध्ये गूळ-साखर घालून मिश्रण परतावे.
- मिश्रण तयार झाले की दोन चमचे मिल्क पावडर, भाजलेली खसखस, सुकामेवा, वेलचीपूड घालावी आणि सर्व मिश्रण एकजीव करावे.
- थोड्या वेळावे जायफळ देखील मिक्स करावे.
- करंजीचे सारण तयार झाले आहे.
- आता करंजीची पुरी लाटा आणि त्यामध्ये सारण भरा.
- करंजीचा साचाही तुम्ही वापरू शकता.
- करंजीची कडा व्यवस्थित बंद करा आणि फिरकीने कडा कापा.
- करंजी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करू नये.
- गॅस मंद आचेवर ठेवा आणि तेलामध्ये करंजी तळून घ्या.
- करंजीचा रंग लालसर झाल्यानंतर प्लेटमध्ये काढा.
- तयार झालीय ओल्या नारळाची कुरकुरीत करंजी.
Video Credit : @vaishalisrecipe