Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat: भाऊबहिणीचे नाते अधिक दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदाचे वर्ष प्रत्येक भाऊबहिणीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. यंदा चार शुभ योग जुळून आल्याचे ज्योतिषाचार्यांचे म्हणणे आहे. भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट करणारे असे हे अद्भुत योग आहेत. यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. यावेळेस रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, शोभन योग तसेच श्रवण नक्षत्र एकत्र येण्याचा मोठा योगायोग जुळून आला आहे. इतकेच नव्हे तर श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने रक्षाबंधनाचा दिवस अतिशय शुभ ठरणार आहे.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2024: भावाला त्याच्या राशीनुसार बांधा राखी, कोणत्या राशीसाठी कोणता रंग अतिशय शुभ आणि लाभदायक ठरेल?)
अद्भुत योगांचा कालावधी कधीपर्यंत आहे?
रक्षाबंधनाच्या दिवशी जुळून आलेले चार अद्भुत योगांचा काळ 19 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच सुरू होईल आणि रात्री 8.40 वाजेपर्यंत असेल. या कालावधीदरम्यान सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगाचा प्रभाव जास्तीत जास्त राहील. या दोन्ही योगांच्या प्रभावाच्या वेळेस बहिणीने भावाला राखी बांधली तर भावांवर येणारे सर्व संकट दूर होऊ शकतात. इतकेच नव्हे तर या योगाच्या प्रभावाने भावाला निरोगी होण्याचे वरदानही मिळेल.
(नक्की वाचा: Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat Time: रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि सणाचे महत्त्व)
पाताळात भद्राकाळाचा निवास कधीपर्यंत असेल? Bhadrakal Time
18 ऑगस्ट मध्यरात्री 2:21 वाजेपासून भद्राकाळास सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्ट दुपारी 1:24 वाजेपर्यंत असेल. या काळादरम्यान भद्राचे निवास पाताळात आहे. भद्राकाळादरम्यान राखी बांधणे शुभ मानले जात नाही. म्हणून या काळाची समाप्ती झाल्यानंतर भावाला राखी राखी बांधणे शुभ ठरेल.
(नक्की वाचा: Raksha Bandhan Wishes: ओवाळीते भाऊराया रे!भाऊ-बहिणीला हे खास मेसेज पाठवून व्यक्त करा तुमची माया)
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat
19 ऑगस्टला दुपारी 1:26 वाजपासून ते संध्याकाळी 6:25 वाजेपर्यंतचा काळ राखी बांधण्यासाठी शुभ आहे.
(नक्की वाचा: राखी पौर्णिमेच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास करावा का? काय आहे नियम?)
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world