Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधन कधी आहे? लाडक्या बहिणीला देण्यासाठी बेस्ट 20 गिफ्ट, तिला नक्की आवडेल!

आम्ही रक्षाबंधनासाठी 20 गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत. (Raksha Bandhan Gift Ideas) ज्यापैकी कोणतंही गिफ्ट तुम्ही आपल्या बहिणीला देऊ शकता. हे गिफ्ट पाहून तिच्या चेहऱ्यावरची खळी खुलेल हे नक्की...

जाहिरात
Read Time: 3 mins

Raksha Bandhan 2025: भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक रक्षाबंधन यंदाच्या वर्षी 9 ऑगस्ट, शनिवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षाचा धागा बांधला जातो. यानिमित्ताने दोघंही एकमेकांना कायम सोबत देण्याचं वचन देतात. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीसाठी खास गिफ्टही घेतात. दरवर्षी नव-नवीन काय द्यायचं याबाबत भावांमध्ये कायम संभ्रम असतो. अशावेळी आम्ही रक्षाबंधनासाठी 20 गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत. (Raksha Bandhan Gift Ideas) ज्यापैकी कोणतंही गिफ्ट तुम्ही आपल्या बहिणीला देऊ शकता. हे गिफ्ट पाहून तिच्या चेहऱ्यावरची खळी खुलेल हे नक्की...


रक्षाबंधानासाठी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी नव्या  आइडिया | Rakhi Gifts For Sister

  1. तुम्ही तुमच्या बहिणीला हेअर ड्रायर, हेअर कर्लर किंवा हेअर स्ट्रेटनर भेट देऊ शकता. हेअर स्टायलिंगमध्ये या भेटवस्तू उपयुक्त आहेत.
  2. तुम्ही स्टायलिश चंक ज्वेलरी भेट देऊ शकता. आजकाल, चंक ज्वेलरी सेट ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत.
  3. शॉवर जेल आणि बॉडी स्क्रबचा कॉम्बो दिलं जाऊ शकतं. याशिवाय सुगंधी बॉडी लोशन हा देखील चांगला पर्याय आहे. 
  4. स्टायलिश वॉचदेखील बहिणीला देता येऊ शकते. जर तिला एनालॉग वॉच आवडत असेल तर ती किंवा स्मार्ट वॉचदेखील देऊ शकता. 
  5. तुम्ही रोपट्यांची कुंडी भेट देऊ शकता. आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या विकल्या जात आहेत.
  6. तुम्ही हेअर सलूनमध्ये हेअर स्पा शेड्यूल करू शकता. तुम्ही तुमच्या बहिणीला सलूनचे गिफ्ट कार्ड देऊ शकता.
  7. बहिणीला इअरबड्स किंवा हेडफोन्स देता येतील. अशी गॅझेट्स बहिणींसाठी खूप उपयुक्त आहेत.
  8. जर बहिणीला कॉफी पिण्याची आवड असेल तर तिला कॉफी मेकर किंवा इलेक्ट्रिक व्हिस्कर देता येईल.
  9. बहिणीला कपड्यांचे वेड असेल तर तिच्या आवडीचे कपडे देता येऊ शकतात. किंवा शॉपिग वेबसाइटचं गिफ्ट कार्ड देता येईल. 
  10. तुम्ही तुमच्या बहिणीला कानातले भेट देऊ शकता. ऑक्सिडाइज्ड किंवा धातूचे कानातले खरेदी करण्याऐवजी, तुम्ही ते चांदी किंवा सोन्याचे कानातले भेट देऊ शकता. सर्वसाधारणपणे, मुलींना चांदीचे कानातले खूप आवडतात.
  11. सध्या स्टेनली कप सारख्या मोठ्या बाटल्या मुलींना आवडत आहेत. या बाटल्या थोड्या महाग असतात. 
  12. बहिणीला शूज देखील देता येऊ शकतात. शूज चांगला पर्याय आहे, आणि हा तुमच्या खिशालाही परवडतो. 
  13. मेकअपसाठी मुली नेहमी उत्साही असतात. चांगल्या ब्रँडचा मेकअप दिला जाऊ शकतो. 
  14. चांगलं वॉटेल किंवा बॅगदेखील बहिणींना गिफ्ट द्यायला चांगला ऑप्शन आहे. 
  15. जर तुमचा बजेट चांगला असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीला कॅमेरा भेट देऊ शकता. तुम्ही इन्स्टंट कॅमेरा किंवा डिजिटल कॅमेरा भेट देऊ शकता.
  16. तुम्ही तिच्या फोनसाठी स्टायलिश कव्हर भेट देऊ शकता. तुम्ही तिच्या लॅपटॉपसाठी कव्हर देखील घेऊ शकता.
  17. मुलींना विविध प्रकारचे सुगंध आवडतात. त्यांना चांगला परफ्यूम दिला जाऊ शकतो. 
  18. एखादा इव्हेंट किंवा वर्कशॉपचं तिकीट बुक करू शकता. पॉटरी आणि पेंटिगचं वर्कशॉप चांगला पर्याय आहे. 
  19. हँडमेड गिफ्ट दिले जाऊ शकतात. कॅरिकेचर्स दिले जाऊ शकतात. 
  20. जर बहिणीला वाचनाची आवड असेल तर तिला कोणत्याही चांगल्या लायब्ररीचं मेंबरशीप कार्ड देता येऊ शकतं.