जाहिरात

Ram Navami 2026: रामनवमीची घरामध्ये पूजा कशी करावी? व्रत नियम, रामरक्षा पठण, नैवेद्याबाबत सविस्तर माहिती वाचा

Ram Navami 2026: राम नवमीला घरच्या घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या उपवासाचे नियम, रामरक्षा पठणाची पद्धत आणि श्री रामाच्या आवडत्या नैवेद्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर जाणून घ्या.

Ram Navami 2026: रामनवमीची घरामध्ये पूजा कशी करावी? व्रत नियम, रामरक्षा पठण, नैवेद्याबाबत सविस्तर माहिती वाचा
"Ram Navami 2026: रामनवमीची घरच्या घरी पूजा कशी करावी?"
Canva

Ram Navami 2026: हिंदू धर्मात चैत्र शुद्ध नवमी अर्थात 'राम नवमी' या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री रामचंद्रांचा जन्म सोहळा घराघरात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. राम नवमीच्या दिवशी केवळ उपवास करणे पुरेसे नसून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करणे आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. घरामध्ये राम जन्मोत्सव कसा साजरा करावा, पूजेचे नियम काय असावे आणि नैवेद्यात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबाबत श्रीकेतन कुलकर्णी गुरुजी यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

घरच्या घरी रामनवमीची पूजा कशी करावी? | Ram Navami 2026 Puja

  1. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा
  2. चौरंगावर श्रीरामांचा फोटो/मूर्ती स्थापित करा
  3. तांब्याच्या भांड्यात पाणी, फुले, अक्षता अर्पण करा
  4. दिवा, अगरबत्ती प्रज्वलित करून पूजा करा

उपवास नियम | Ram Navami 2026 Vrat Rules

  1. पूर्ण दिवस उपवास किंवा फलाहार
  2. सात्विक आहार - फळे, दूध
  3. मन शांत ठेवा, वाईट विचार टाळा
रामरक्षा पठण (पाणी घेऊन कसे करावे?)
  1. तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या
  2. उजवा हात पाण्यावर ठेवा
  3. श्रद्धेने रामरक्षा स्तोत्र म्हणा
  4. ते पाणी प्या किंवा घरात शिंपडा

(नक्की वाचा: Happy Ram Navami 2026 Wishes 25+: रामाचा आदर्श, रामाची भक्ती! रामनवमीच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा)

नैवेद्य (प्रसाद)

  1. पानक (गुळ + पाणी)
  2. खीर, पुरण
  3. फळे, तुळशीपत्र

राम फळाचे महत्त्व

  1. गोड फळे अर्पण करणे शुभ मानले जाते
  2. रामफळ म्हणजे सात्विकता आणि शुद्धता
  3. आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक

(नक्की वाचा: Happy Ram Navami 2026 Wishes: रामाचा आदर्श मनी ठेवूया, सत्याची कास कधी न सोडूया; रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!)

श्रीराम जन्म सोहळा

  1. दुपारी 12 वाजता घंटानाद करावा.
  2. यानंतर आरती करावी.
  3. “श्रीराम जय राम जय जय राम” जप करावा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com