जाहिरात

Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा

Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबतच्या अफवा पसरल्याने नागरिकांनी साठवणुकीसाठी गर्दी केली आहे. ही साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत निर्बंध लादले आहेत.

Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याबाबत पसरलेल्या अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पेट्रोल पंपांवर 'पॅनिक बुकिंग' आणि साठवणुकीसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इंधन विक्रीवर कडक निर्बंध लागू केले आहेत.

नवीन नियमावली काय आहे?

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विशेष आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 31 मार्च 2026 पर्यंत खालीलप्रमाणे इंधन दिले जाईल. दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयांचे पेट्रोल मिळेल. चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त 2000 रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल मिळेल. कॅन आणि बाटल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Cylinder Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले? केंद्र सरकारने परिपत्रक जारी करत स्पष्ट सांगितलं)

पंप चालकांना सक्त इशारा

शहरातील काही पेट्रोल पंपांवर सर्रासपणे बाटल्यांमध्ये इंधन दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंप चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आणि पंपांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

(नक्की वाचा-  Alcohol Prices to Rise: मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री! बिअर आणि दारुच्या किमती वाढणार? काय आहे कारण?)

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

जिल्हा पुरवठा कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केवळ अफवामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात साठवणूक करत आहेत, ज्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता केवळ गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पश्चिम आशियातील युद्धाच्या बातम्यांदरम्यान अफवांनाही पेव फुटलं आहे. या अफवेने कोल्हापूरकरांनी घरांमध्ये पेट्रोल साठवण्यास सुरुवात केली, जी सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com