जाहिरात

Ram Navami 2026 Puja Vidhi: राम नवमीची पूजा कशी करावी? पूजा साहित्य, पूजेची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर

Ram Navami 2026: रामनवमी 2026 निमित्त श्रीरामांची पूजा कशी करावी? जाणून घ्या शास्त्रोक्त पूजा विधी, साहित्याची यादी, नैवेद्य यासह सविस्तर माहिती...

Ram Navami 2026 Puja Vidhi: राम नवमीची पूजा कशी करावी? पूजा साहित्य, पूजेची योग्य पद्धत जाणून घ्या सविस्तर
"Ram Navami 2026: राम नवमीची पूजा कशी करावी?"
Canva

Ram Navami 2026: चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच 'राम नवमी', हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि आनंदाचा सण. श्रीरामांचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला, म्हणूनच हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी घराची स्वच्छता करून, नवीन वस्त्रे परिधान करून श्रीरामाची आराधना करण्याची परंपरा आहे. या मंगल दिनी श्रीरामाच्या मूर्तीचे षोडशोपचार पूजन, शंखनाद, पाळणा आणि सुंठवड्याचा नैवेद्य याला विशेष महत्त्व असते. भक्तीभावाने केलेली ही पूजा कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते. रामनवमीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आणि शास्त्रशुद्ध पूजा विधीची सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया... 

राम नवमी पूजा विधीची महत्त्वाची माहिती | Ram Navami 2026

  1. श्रीरामांचा जन्म माध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता साजरा करतात.

  2. श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.
  3. दुपारी 12 वाजता शंखनाद करून "प्रभू श्रीरामचंद्र की जय" असा जयघोष करावा.
  4. पाळणा झाल्यावर पूजनाला प्रारंभ करावा.
  5. नैवेद्याला सुंठवडा अर्पण करावा आणि सुठंवडा सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.  
  6. श्रीरामासाठी तुळशी आणि चाफ्याच्या फुलांचा हार करावा.
  7. पूजनानंतर श्रीरामाची आरती करावी.

राम नवमीच्या पूजेची सामग्री | Ram Navami 2026 Puja Samagri List

  1. आचमनाचे साहित्य (ताम्हण, पंचपात्री, तांब्या, पळी)
  2. निरांजन
  3. पूजेचे तबक
  4. समई, समईखालील थाळी
  5. उदबत्तीचे भांडे आणि थाळी
  6. घंटा, अक्षता, हळद-कुंकू
  7. सुपार्‍या, विड्याची पाने – 5
  8. सुटे पैसे, तुळशी, उदबत्ती, फुलवाती आणि समईच्या वाती
  9. काडेपेटी, गंध, एक श्रीफळ, फुलांची आणि तुळशीची माळ (एकत्रित)
  10. दवणा, पाट, फळे, सुंठवड्याचा नैवेद्य, रांगोळी
(नक्की वाचा: Ram Navami 2026: राम नवमी कधी साजरी करावी? 26 की 27 मार्च? जाणून घ्या अचूक तारीख, मध्यान्ह काळ आणि शुभ मुहूर्त)राम नवमीची पूजा कशी करावी? | Ram Navami 2026 Puja Vidhi 
  1. आचमन, कलशपूजन, घंटापूजन, दीपपूजन आणि प्रार्थनेचे स्वरुप
  2. शक्य असल्यास पूजा करताना सोवळे नेसावे.  
  3. पहाटे लवकर उठावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे.
  4. आचमनाने पूजेचा शुभारंभ करावा.
  5. एका स्वच्छ ठिकाणी चौरंग मांडून श्रीरामाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी.
  6. पूजा करताना स्वत:ला कुंकू लावून घ्यावे. नंतर हात जोडून शांत मनाने पुढील देवतांचे स्मरण करावे.
  7. गंगाजलाने अभिषेक करावा आणि चंदन, अक्षता, फुले आणि वस्त्र अर्पण करावे.
  8. यानंतर धूप-दीप लावून पूजा करावी आणि नैवेद्य अर्पण करावा. 
  9. तुम्ही राम मंत्र किंवा रामायणाचे पठणही करू शकता.
  10. शेवटी देवाकडे सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी.
रामनवमी 26 मार्च की 27 मार्चला साजरी करावी? , पाहा व्हिडीओ

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com