'भल्लालदेव' दारू विकू लागला, खंब्यासाठी मोजावे लागतील 5 ते 7 हजार रुपये

2024 साली अमेरिकेत राणा डुग्गुबाटी आणि अनिरूद्ध रविचंदर यांच्या दारूच्या ब्रँडचे अधिकृत लाँचिंग करण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासोबतच स्वतःचा व्यवसायही चालवतात आणि त्यातूनही चांगले पैसेही कमावतायत. अभिनय आणि व्यवसायाव्यतिरिक्त हे कलाकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही करत असून त्यातूनही त्यांना चांगला फायदा होतो आहे. काही कलाकार हे दारू निर्मितीच्या व्यवसायात उतरले असून बाहुबली चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबतीने स्वत:चा दारू निर्मिती ब्रँड सुरू केला आहे.  कॉफी, गेमिंग, रेस्टॉरंटमध्ये पैसे गुंतवल्यानंतर राणा डुग्गुबाटीने दारू निर्मितीमध्ये पाय ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी राणा याने आपला 'अल्कोबेव' नावाचा दारूचा ब्रँड लाँच केला होता.

नक्की वाचा: सत्य घटनांवर आधारीत आहे 'धुरंधर', रिलीजनंतर पाकिस्तानची आणखी लाज जाण्याची शक्यता

प्रसिद्ध संगीतकार आहे राणाचा भागीदार

राणा डग्गुबतीने 'अल्कोबेव' या ब्रँडची सुरूवात प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरसोबत मिळून केली आहे.भारतामध्ये अद्याप या ब्रँडने आपली पावले पूर्णपणे रोवलेली नाहीत. ड्युटी फ्री शॉप्सवर मात्र ही या ब्रँडची दारू उपलब्ध असून खंब्यासाठी म्हणजेच 750 एमएलच्या टकीलाची बाटली जवळपास 5 हजार ते 7 रुपयांना विकली जात आहे. राणा आणि अनिरुद्ध यांच्या टकीलाचे नाव 'लोका लोका'ठेवण्यात आले असून हे नाव स्पॅनिश आणि संस्कृत शब्द एकत्र करून तयार करण्यात आले आहे. स्पॅनिश भाषेत 'लोका' म्हणजे क्रेझी असा अर्थ होतो तर संस्कृतमध्ये 'लोका' शब्दाचा अर्थ वर्ल्ड किंवा जग असा होतो.

नक्की वाचा: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांमधून पिवळा किंवा पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो?

अमेरिकेमध्ये करण्यात आले लाँचिंग

2024 साली अमेरिकेत राणा डग्गुबती आणि अनिरूद्ध रविचंदर यांच्या दारूच्या ब्रँडचे अधिकृत लाँचिंग करण्यात आले होते. ही दारू तयार करणाऱ्या विली बानुएलोस यांनी सांगितले की, दारू निर्मिती जिथे होते तिथे संगीत लावण्यात येते. या संगीताचा किण्वन प्रक्रियेवर चांगला परिणाम होतो असा दावा करण्यात आला आहे. संगीतकार अनिरूद्ध याने दारूची चव अधिक चांगली व्हावी यासाठी संगीताचा वापर करण्याची कल्पना आवडल्याचे सांगितले. 

Topics mentioned in this article