बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'धुरंधर' रिलिजसाठी सज्ज झाला असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. या ट्रेलरमुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता बरीच वाढली आहे. या ट्रेलरमुळे रणवीर सिंगसह या चित्रपटात कोण प्रमुख भूमिकांमध्ये आहे ते कळू शकले आहे. मात्र चित्रपटाची कथा काय आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चर्चेतून हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत असावा अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटातील आर.माधवनचा लुक हा प्रामुख्याने चर्चेचा विषय बनला आहे. माधवन हा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासारखा दिसत असून तो, डोवाल यांच्याशी मिळतं जुळतं पात्र साकारत असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रत्यक्ष जीवनातील कोणत्या व्यक्तींची या सगळ्यांनी भूमिका साकारली आहे याबद्दल मोठी उत्सुकता असून, सोशल मीडियावर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
'धुरंधर' चित्रपटात 'रणवीर सिंह'कोणाची भूमिका साकारतोय?
धुरंधर चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेते प्रत्यक्ष जीवनातील कोणाची पात्रे साकारत आहेत, याबद्दल जबरदस्त चर्चा सुरू आहे. रणवीर सिंहच्या पात्राबद्दल धुरंधर चित्रपटाच्या ट्रेलरमधून फारसं कळू शकलेलं नाही. मात्र तो गुप्तहेराची किंवा पाकिस्तानमध्ये मिशनवर असलेल्या भारतीय सैन्यदलाच्या जवानाची भूमिका साकारत असावा असा अंदाज बांधला जात आहे. चित्रपटातील त्याचा एकूण लूक पाहून तो मेजर मोहित शर्मांचे पात्र साकारत असावा असा कयास बांधला जात आहे.
RanveerSingh | Dhurandhar TrailerLaunch | 'धुरंधर' ट्रेलर लाँच: रणवीर सिंगचा उत्साह! चाहते म्हणाले, 'हा चित्रपट हिट
— NDTV Marathi (@NDTVMarathi) November 19, 2025
होणार!'#RanveerSingh #Dhurandhar #Trailer #BollywoodHits #NewTrailer #FilmNews #RanveerMania #ActionFilm #MovieUpdate #MustWatch #ndtvmarathi | prd pic.twitter.com/KfMzCBA3Zc
'धुरंधर' चित्रपटात अर्जुन रामपाल कोणाची भूमिका साकारतोय?
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अर्जुन रामपालचे 'मेजर इक्बाल'ची भूमिका साकारतोय. तो एका एका भारतीय जवानाचा छळ करताना दाखवण्यात आला आहे. या जवानाच्या शरीरावर ठीकठिकाणी माशासाठीचा गळ टोचण्यात आल्याचे दाखवण्यात आले असून हा जवान रक्तबंबाळ झाल्याचे दिसते आहे. मुहम्मद झिया-उल-हक हे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. भारताला रक्तबंबाळ करा अशी त्यांनी धमकी दिली होती. मेजर इक्बालने त्यापासून प्रेरणा घेत भारतीय जवानाचा छळ केल्याचे दाखवण्यात आले आहे. मेजर इक्बालचे पात्र प्रत्यक्ष जीवनातील 'इलियास काश्मिरी' नावाच्या दहशवतवाद्यावर आधारीत असल्याचे बोलले जात आहे. इलियास काश्मिरी हा कुख्यात दहशतवादी होता आणि त्याला नवा ओसामा बिन लादेन म्हटले जात होते.
Thread #Dhurandhar real life characters and onscreen depictions - A casting genius
— BollyGupp (@BollyGup) November 18, 2025
1) Arjun Rampal as Major Iqbal, ISI
The name "Major Iqbal" in the context of the ISI is most likely referring to a past case involving David Headley and the 2008 Mumbai attacks, where an ISI… pic.twitter.com/XuACztZZKE
'धुरंधर' चित्रपटात आर. माधवन कोणाची भूमिका साकारतोय?
धुरंधर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आर. माधवनने भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) च्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अजय सन्याल असं या पात्राचं नाव असून आर. माधवनचे साकारत असलेली भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून प्रेरित असल्याचे दिसते आहे.
'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्ना कोणाची भूमिका साकारतोय?
चित्रपटात अक्षय खन्ना रहमत डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार रहमत डाकू - ज्याचे खरे नाव सरदार अब्दुल रहमान बलुच होते,कराचीमधील सर्वात कुख्यात गुन्हेगारांपैकी तो एक होता.
Akshaye Khanna as Rehman Dakait (based on Rehman Dakait)#Dhurandhar pic.twitter.com/BPlqr5OnsO
— BollyGupp (@BollyGup) November 18, 2025
'धुरंधर' चित्रपटात संजय दत्त कोणाची भूमिका साकारतोय?
संजय दत्तने एसपी चौधरी अस्लमच्या रूपात बंदूक आणि सिगारेट ओढताना आपला सिग्नेचर स्वॅग दाखवला आहे. संजय दत्त साकारत असलेली भूमिका पाकिस्तानच्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या आणि एनकाऊन्टरर स्पेशालिस्टवरून घेतल्याचे बोलले जात आहे. रहमत डाकू आणि अर्शद पप्पूलसारख्या गुंडांना अटक करणे किंवा यमसदनी पाठवणे हे या अधिकाऱ्याचे टार्गेट होते. ल्यारी भागात गुंडांविरोधात या अधिकाऱ्याने मोहीम उघडली होती.
#SanjayDutt as SP Chaudhary Aslam (based on Chaudhry Aslam Khan)#Dhurandhar #DhurandharTrailer pic.twitter.com/APjzEO8FDj
— BollyGupp (@BollyGup) November 18, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world