राशी भविष्य हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज 27 मे ला तुमच्या राशीत काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहे. काही राशीच्या लोकांना आजचा दिवस हा सुखद असेल. त्यांना अनेक गोष्टीत फायदा होणार आहे. तर काही राशीच्या लोकांना आज जपून रहावं लागेल. वागताना बोलताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. काहींना तर आजचा दिवस सोन्याचा असणार आहे. त्यांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तर काहींना पगार वाढीचा सुखद धक्का ही मिळू शकतो. तर मग आज 27 मे 2027 या दिवशी तुमच्या राशीत काय आहे ते नक्की पाहा.
- मेष-नवीन हितशत्रू निर्माण होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात गुप्तता बाळगणे गरजेचे आहे. नोकरीत नवीन मोठे अधिकार मिळतील.
- वृषभ- जुने आजार पुन्हा डोके वर काढू शकतात. इतरांच्या वादात पडणे महागात पडेल. व्यवसायात मोठी घोडदौड होईल.
- मिथुन- घाईघाईने निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. बँकेच्या कामातून आर्थिक फायदा होईल.
- कर्क- अवाजवी खर्चामुळे मानसिक ताण वाढू शकतो. महत्त्वाच्या वस्तू प्रवासात सांभाळा. बेरोजगारांना परदेशात नोकरीची संधी मिळेल.
- सिंह- नकारात्मक विचार मनात आणू नका. आज कोणालाही कर्ज देऊ नका. शेअर मार्केटमधून उत्तम धनलाभ होईल.
- कन्या- कुटुंबात वाद होऊ शकतात. कायदेशीर बाबींत दुर्लक्ष टाळा. व्यापारात फायदेशीर कंत्राट मिळेल.
- तूळ- गुंतवणूक करताना फसवणूक होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अडकलेले पैसे अचानक परत मिळतील.
- वृश्चिक- वरिष्ठांशी बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे कागदपत्र हरवण्याची भीती आहे. नोकरीत पगारवाढ मिळेल.
- धनु- आज कामाचा ताण जास्त राहील. जवळच्या मित्रांकडून दगाफटका होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ होईल.
- मकर- भागीदारीच्या व्यवसायात मतभेद होऊ शकतात. आज नवीन कामाची जोखीम घेऊ नका.उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सुरू होतील.
- कुंभ- शत्रू तुमच्या प्रतिमेला धक्का लावू शकतात. महत्त्वाच्या कामात दिरंगाई टाळा. लॉटरी किंवा विम्याचे पैसे मिळतील.
- मीन- कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. आज उधारीचे व्यवहार करणे टाळा. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world