RBI चा सर्वात मोठा निर्णय! प्रत्येक आठवड्याला अपडेट होणार Credit Score, कर्ज आणि क्रेडिट कार्ड असणाऱ्यांनी..

जर तु्म्ही नुकतंच कर्ज फेडलं असेल किंवा क्रेडिट कार्डची संपूर्ण थकबाकी दिली असेल, तर तुम्हाला आता क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी खूप महिन्यांची वाट पाहावी लागणार नाही. वाचा सविस्तर माहिती.

जाहिरात
Read Time: 3 mins
RBI Credit Score New Rules 2026

RBI Latest News Update :  जर तु्म्ही नुकतंच कर्ज फेडलं असेल किंवा क्रेडिट कार्डची संपूर्ण थकबाकी दिली असेल, तर तुम्हाला आता क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी खूप महिन्यांची वाट पाहावी लागणार नाही.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्या नियमांमुळे क्रेडिट स्कोर अपडेट होण्याची गती वाढली आहे आणि 2026 मध्ये ती आणखी वेगवान होणार आहे. याचा थेट फायदा त्या लोकांना होईल जे पहिल्यांदाच घर खरेदी करणार आहेत. तसच ज्यांना त्यांचा क्रेडिट स्कोअर सुधारायचं आहे, त्यांनाही याचा फायदा होणार आहे. 

क्रेडिट स्कोअर अपडेटमध्ये काय बदल झाले?

जानेवारी 2025 पासून RBI ने बँका आणि NBFC यांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी क्रेडिट ब्युरोला महिनाभरात किमान दोन वेळा डेटा पाठवावा. याआधी हा डेटा 30 ते 45 दिवसांत अपडेट होत असे. आता लोन प्री-पेमेंट किंवा क्लोज केल्याचा परिणाम जवळपास दोन आठवड्यांतच दिसू लागतो.

RBI ने 2026 पासून क्रेडिट स्कोअर प्रत्येक 7 दिवसांनी अपडेट करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.यानुसार 7, 14, 21, 28 आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी क्रेडिट डेटा रिफ्रेश केला जाईल. म्हणजेच तुम्ही क्रेडिट कार्ड बंद केले, EMI वेळेवर भरली किंवा एखादी चूक सुधारली, तर त्याचा परिणाम काही दिवसांतच क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसू शकतो.

नक्की वाचा >> पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीला मोठा धक्का, करिष्मा बारणेंसह या उमेदवारांचे AB फॉर्म रद्द, कारण काय?

लोक अनेकदा असा विचार करतात की क्रेडिट स्कोअर महिन्यातून एकदाच ठरतो, पण तसं नाही. जेव्हा तुमचा क्रेडिट डेटा अपडेट होतो किंवा एखादी बँक तुमचा रिपोर्ट तपासते,तेव्हा त्या वेळी उपलब्ध माहितीनुसार तो स्कोअर तयार होतो. पेमेंटमध्ये उशीर,नवीन कर्ज किंवा वेळेवर भरलेले EMI, या सर्वांचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट कार्डवर लगेच होऊ शकतो. 

Advertisement

SMS आणि ईमेल अलर्टमुळे वाढली सुरक्षा

जेव्हा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट रिपोर्ट पाहते,तेव्हा तुम्हाला SMS किंवा ईमेल अलर्ट मिळेल.त्यामुळे जर कोणी तुमच्या नावावर फसवणुकीने कर्ज किंवा कार्ड घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला याची माहिती लगेच मिळेल.

डिफॉल्ट होण्यापूर्वी सूचना आवश्यक

RBI च्या नियमांनुसार, एखाद्या खात्याला डिफॉल्ट घोषित करण्यापूर्वी बँकेने ग्राहकाला कळवणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकाला वेळेवर पेमेंट करण्याची संधी मिळेल आणि विनाकारण क्रेडिट स्कोर खराब होणार नाही.

Advertisement

नक्की वाचा >> निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत खळबळ! पंजाबच्या 25 आरोपींना केली अटक, काय आहे प्रकरण?

तक्रारीचे लवकर निराकरण

जर क्रेडिट रिपोर्टमध्ये काही चूक असेल आणि 30 दिवसांत ती सुधारली गेली नाही, तर ग्राहकाला दररोज ₹100 भरपाई मिळू शकते. यामुळे बँका आणि क्रेडिट ब्युरोवर वेळेत सुधारणा करण्याचा दबाव वाढेल.

ग्राहकांना काय मिळणार फायदा?

वेळेवर पेमेंट करणाऱ्यांचा क्रेडिट स्कोर लवकर सुधारेल
कर्ज आणि क्रेडिट कार्ड मंजुरीची प्रक्रिया जलद होईल
चांगल्या क्रेडिट स्कोरवर कमी व्याजदर मिळू शकतो
क्रेडिट सुधारण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल

Advertisement