घर खरेदी हा आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. अनेकदा सामाजिक दबावात घर घेण्याचा निर्णय घेतला जातो. आजही भारतात भाड्याच्या घरात राहतो असं सांगणं कमीपणाचं वाटतं. त्यामुळे तुमचं यश दाखविण्यासाठी आणि लग्नाच्या मागणीतही स्वत:चं घर ही अट घातली जाते. अनेकदा बिल्डर्स आणि मार्केटिंग एजन्सी सर्वसामान्यांच्या याच भावनेचा फायदा घेत सर्वसामान्यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवलं जातं. भारतातील मध्यमवर्गासाठी घरासोबत एक भावनिक नातं असतं. त्यामुळे बिल्डर्स मार्केटिंगची आखणी सर्वसामान्यांच्या मानसिकतेनुसार करतात. भावनिक असणं चांगली बाब आहे, मात्र कर्ज घेऊन भावनिकता गोंजारणं धोकादायक आहे.
घर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा...
अनेकदा बिल्डर्स असे प्रकल्प विकतात जे वास्तववादी नसतात. जिम, क्लब हाऊस, आलिशान लाइफस्टाइलचं वचन देतात, मात्र प्रत्यक्षात पजेशनमध्ये दशकं लावतात. खरेदीदार जमा केलेले पैसे आणि सेविंग्ज अशा अनरियल घरासाठी खर्च करतो. बिल्डर अनेकदा 'आता बुक करा आणि ताबा मिळेपर्यंत EMI भरू नका' किंवा 'नो ईएमआय टिल पझेशन' अशा योजनाचं प्रलोभनं देतात. वरवर पाहता अशा योजना फायदेशीर वाटतात, परंतु त्यामागे काही छुपे धोके असतात.
अशा योजनांमध्ये घराची मूळ किंमत बाजारभावापेक्षा १०-१५% जास्त असू शकते. बिल्डर व्याजाचा भार सोसण्याचा दावा करत असले, तरी ताबा मिळण्यास उशीर झाल्यास व्याजाचा बोजा शेवटी ग्राहकाच्याच डोक्यावर येतो.
नक्की वाचा - स्वप्नात पैसे दिसतात? श्रीमंत होण्याचं लक्षण? जाणून घ्या काय होतो याचा अर्थ
घराची मूळ किंमत (Base Price) कमी दाखवून बिल्डर नंतर इतर अनेक खर्च लावतात.
स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि मेंटेनन्स डिपॉझिटमुळे बजेट २० टक्क्यांनी वाढू शकते.
सॅम्पल फ्लॅट हा नेहमीच प्रशस्त आणि लक्झरी साहित्याने सजवलेला असतो. तिथे वापरलेले फर्निचर, आरसे आणि लाइटिंग अशा प्रकारे असते की जागा मोठी वाटते. तेच प्रत्यक्ष ताबा मिळणाऱ्या फ्लॅटमध्ये 'कार्पेट एरिया' किती आहे, हे नीट तपासा. सॅम्पल फ्लॅटमधील सजावटीला भुलू नका.
या बाबींकडे दुर्लक्ष करू नका...
कोणताही प्रकल्प बुक करण्यापूर्वी तो 'रेरा' अंतर्गत नोंदणीकृत आहे का, याची खात्री करा.
बिल्डरने यापूर्वी दिलेले प्रकल्प वेळेवर पूर्ण केले आहेत का, हे तपासा.
जमिनीचे टायटल डीड, OC आणि CC यांची कायदेशीर तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.