- प्रेमानंद महाराजांच्या मते, पतीने पत्नीच्या इच्छांचा आदर करणे आणि तिच्या पसंतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे
- संसार टिकवण्यासाठी भौतिक सुखांपेक्षा प्रेम आणि निष्ठेचा आधार अधिक महत्त्वाचा ठरतो, असे त्यांनी सांगितले
- व्यभिचार टाळणे आणि पत्नीप्रती एकनिष्ठ राहणे हे आनंदी वैवाहिक जीवनाचा मुख्य मंत्र मानले जाते
Relationship Tips: नात्यातील विश्वास आणि प्रेम जपण्याचा मार्ग कोणता हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. आजच्या धावपळीच्या काळात पती-पत्नीच्या नात्यात प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनातून या विषयावर अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले आहे. पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी केवळ भौतिक सुखे पुरेशी नसून, प्रेमाचा आणि निष्ठेचा आधार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय अन्य काही गोष्टींवर ही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
इच्छांचा आदर आणि प्राधान्य याला महत्वे दिले पाहीजे असं ही त्यांनी सांगितले. महाराजांच्या मते, पत्नीला आनंदी ठेवण्याचा पहिला नियम म्हणजे तिच्या इच्छांचा आदर करणे. तिच्या पसंती-नापसंतीकडे लक्ष देणे आणि तिच्या मनाविरुद्ध गोष्टी टाळणे असं ही त्यांनी सांगितलं. हे केवळ कर्तव्य नसून तिच्याप्रती असलेला आदर आहे. जेव्हा पती आपल्या पत्नीच्या मताला महत्त्व देतो, तेव्हा नात्यात आपोआपच गोडवा निर्माण होतो.
नक्की वाचा - चहा सोबत काय खावू नये? 'हे' पदार्थ खाणे टाळा नाही तर अनेक समस्यांचे व्हाल शिकार
निष्ठेला सर्वोच्च महत्त्व द्यावे असं ही त्यांनी सांगितलं. प्रेमानंद महाराजांनी चारित्र्य आणि निष्ठेला संसाराचा कणा मानले आहे. ते म्हणतात की, तुम्ही पत्नीला सर्व सुखे दिली तरीही जर तुमचे दुसऱ्या स्त्रीशी संबंध असतील, तर कोणतेही सुख तिला समाधान देऊ शकत नाही. नात्यातील विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडणे कठीण असते. त्यामुळे आपल्या पत्नीप्रती एकनिष्ठ राहणे हा आनंदी वैवाहिक जीवनाचा सर्वात मोठा मंत्र आहे.
महाराजांनी व्यभिचारापासून दूर राहण्याचा कडक सल्ला दिला आहे. ते सांगतात की, कोणत्याही पत्नीसाठी आपल्या पतीचे दुसऱ्या स्त्रीशी असलेले संबंध ही सर्वात मोठी वेदना असते. जर तुम्हाला तुमच्या संसारात सुख आणि शांतता हवी असेल, तर आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहा. ही एकनिष्ठता तुम्हाला जगातले सर्व सुख मिळवून देईल. सध्या विवाहबाह्य संबंधामुळे अनेक लग्न तुटत असल्याचं समोर आलं आहे. ते एक दोघांच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण ठरतं.