Ayurevada Tips: चपातीला तूप लावून खाणे योग्य का अयोग्य? आयुर्वेदात दडलंय उत्तर

Roti With Ghee: चपातीला तूप लावून खाणं अनेकांना आवडतं. मात्र चपातीला तूप लावून खाणे शरीरासाठी योग्य आहे का अयोग्य असा प्रश्नही पडतो. पतंजली योगपीठ (Patanjali Yogpeeth) चे आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

Chapati la Tup Lavun Khave Athwa Nahi: तूप हा भारतीय स्वयंपाकघरातील एक एक महत्त्वाचा घटक आहे. तूप हे आरोग्यासाठी चांगले असते सोबतच ते पदार्थांची चवही वाढवते. साजूक तूप हे आयुर्वेदात अमृतासमान मानले गेले आहे. भारतामध्ये असंख्य घरांमध्ये चपातीसोबत भाजी नसेल तर तुपासोबत चपाती खाल्ली जाते. अनेकांना तुपासोबतच चपाती खाणे आवडते. मात्र चपातीला तूप लावून खाणे योग्य आहे का अयोग्य हा प्रश्न अनेकांना पडणे स्वाभाविक आहे. आयुर्वेदामध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडते. पतंजली योगपीठाचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण यांनी या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. ते काय आहे ते पाहूया.  

(नक्की वाचा:हेल्मेट घातल्यानेही केस गळतात? एक्सपर्टनी सांगितलं केसांवर काय होतो परिणाम)

चपाती खाण्याची योग्य पद्धत काय आहे?

आचार्य बाळकृष्ण यांनी YouTube वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, , "तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तूप खाल्ल्याने तुम्हाला एकाच वेळी अनेक फायदे मिळतात. विशेषतः, त्यात असलेले फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन) ए, डी, ई आणि के आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. पण इतके फायदे असूनही, पोळीला तूप लावून खाऊ नये."

Advertisement

(नक्की वाचा: जुलै महिन्यात शनी आणि गुरू बदलणार चाल, 3 राशींच्या व्यक्तींना होणार फायदा)

असे का करू नये?

आचार्य बालकृष्ण यांच्या मते, पोळीला तूप लावून खाणे हे पोटासाठी चांगले नाही. त्यामुळे पचनक्रियेला त्रास होऊ शकतो. चपातीवरील तुपाचा थर अन्नाचे योग्य पचन करण्यात अडथळा निर्माण करतो. यामुळे तुम्हाला  गॅस, अपचन किंवा पोट जड झाल्यासारखे वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चपातीला तूप लावून खाणे टाळले पाहीजे. चपातीला तूप लावण्याऐवजी तुम्ही चपातीसोबत भाजी किंवा डाळ खात असाल तर त्यामध्ये तूप घालून खाऊ शकतो. थेच चपातीला तूप लावण्याऐवजी भाजी किंवा डाळीमध्ये तूप घातल्याने त्याचा शरीराला अपाय होत नाही.  

Advertisement

(नक्की वाचा: आंघोळीसाठी साबण कसा निवडाल? त्वचा आणि ऋतूनुसार बदल करावा का?)

आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले की अनेक घरांमध्ये चपाती भाजल्यानंतर ती मऊ राहावी यासाठी त्यावर तूप लावतात. मात्र असे करण्याऐवजी कणीक मळत असतानाच त्यामध्ये तूप घातले तर चपात्या कडक होणार नाही आणि तुमच्या पोटालाही काही त्रास होणार नाही. 

Advertisement
Topics mentioned in this article