जाहिरात

Horoscope July 2025: जुलै महिन्यात शनी आणि गुरू बदलणार चाल, 3 राशींच्या व्यक्तींना होणार फायदा

Saturn and Jupitej July 2025: जुलै महिन्यात शनी आपली चाल बदलणार आहे. शनी वक्री होणार असून गुरू 'अस्त' अवस्थेतून उदयावस्थेत येईल. गुरू आणि शनीच्या बदललेल्या चालीमुळे कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घ्या.

Horoscope July 2025: जुलै महिन्यात शनी आणि गुरू बदलणार चाल, 3 राशींच्या व्यक्तींना होणार फायदा
मुंबई:

Guru Uday-Shani Vakri in July: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपले स्थान आणि चाल बदलत असतो. जुलै महिन्यात शनी आणि गुरू या दोन ग्रहांची स्थिती आणि चाल बदलणार आहेत. 9 जुलै रोजी पहाटे 4 वाजून 44 मिनिटांनी गुरू 'अस्त' अवस्थेतून उदयावस्थेत येणार आहे. 13 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 36 मिनिटांनी शनीची वक्री चाल सुरू होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार वक्री चालचा अर्थ उलट दिशेची चाल असा होतो. (What is Shani Vakri meaning?) शनी आणि गुरुच्या बदलाचा परिणाम सगळ्या राशींवर होणार आहे. मात्र काही राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांच्यासाठी हा बदल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात इतके चांगले बदल होतील ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल.  जाणून घेऊया या तीन राशी कोणत्या आहेत. (Which zodiacs get positive results from Shani and Guru?)

धनु रास:

शनी-गुरू या दोन ग्रहांच्या स्थिती आणि चाल बदलीमुळे धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात फार छान बदल झालेले पाहायला मिळतील. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता येईल. व्यापार, उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींच्या बऱ्याच काळापासून अडकलेले व्यवहार, भागीदारीची बोलणी पूर्ण होतील आणि त्यातून आर्थिक फायदा होऊ शकेल. जवळच्या व्यक्तींची उत्तम साथ लाभेल आणि त्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहील. 

च्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गाला नवीन भागीदारी किंवा करारांमधून धन कमावण्याच्या संधी मिळतील. भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रात एखाद्या नवीन प्रकल्पात सहभाग होण्याचीही शक्यता आहे. आप्तेष्टांची साथ मिळेल.

तूळ रास:

जुलै महिन्यात शनि आणि गुरुची स्थिती आणि चाल बदलत असल्याने हा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. वैवाहीक आयुष्यात शांतता नांदेल, नोकरी किंवा व्यवसायामध्ये चांगल्या संधी समोरून चालत येतील. सगळे मनासारखे होणार असल्याने उत्साह संचारलेला असेल आणि आत्मविश्वासही द्विगुणित होईल. जोडीदाराचीही चांगली साथ लाभेल आणि या काळात आधीपासून केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. या काळात आरोग्याशी निगडीत समस्यांचाही त्रास होणार नाही.  

वृषभ रास:

गुरू-शनीच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगला फरक पडल्याचे त्यांना स्वत:लाच जाणवेल. या काळात आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढलीत आणि त्यातून चांगली आवक होऊ शकेल. वडिलोपार्जित मालमत्ता किंवा नव्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये आलेला कडवटपणा, मतभेद दूर होण्यास मदत होईल. यामुळे मानसिक आरोग्य छान राहील आणि मन प्रसन्न राहील. तुम्ही ज्या गोष्टींच्या योजना आखल्या होत्यात त्या आता प्रत्यक्षात उतरताना दिसतील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com