Gulab jam and jalebi : सामोसा आणि जिलबी सिगारेट इतके धोकादायक; AIIMS च्या आदेशानंतर नागपुरात इशारा देणारे फलक

ट्रान्स फॅट्स आणि साखर हे आता नवीन तंबाखू आहेत, अर्थात शरीराला अपायकारक असलेल्या तंबाखू सारखेच ट्रान्स फॅट्स आणि साखर अपायकारक आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Nagpur News : सिगारेटच्या पाकिटांवर घशाचा कॅन्सर किंवा तत्संबंधित भीतीदायक चित्रे लावलेली असतात. ग्राहकाने त्याचा वापर करण्यापूर्वी ते चित्र पाहून अलर्ट व्हावे हा त्यामागील हेतू असतो. मात्र नागपुरात लवकरच सामोसे, जिलेबी आणि चहा बिस्किटांजवळ आरोग्यविषयक इशारा देणारं फलक लावण्याचा प्लान आहे. तुम्ही जेथून असे पदार्थ खरेदी कराल, तेथे हे फलक लावले जातील. सिगारेटप्रमाणेच आता अतिरिक्त साखर आणि तेलाचा वापर केलेल्या अन्नपदार्थांवरही इशारे लिहिले जाणार आहेत. (Gulab jam and jalebi are as dangerous as cigarettes)

आपण खात असलेल्या एका गुलाबजाममध्ये पाच चमचे साखर असते. आपल्याला आवडत असलेल्या सामोस्यांमध्ये ट्रान्स फॅट असण्याची शक्यता असते. सामोसा आणि जिलेबीदेखील सिगारेट इतकेच शरीरासाठी घातक असल्याची माहिती कळल्यावर धक्काच बसेल. त्यामुळे सर्रासपणे गुलाबजाम, जिलेबी आणि समोसाच्या फडशा पाडणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 

Advertisement

सिगारेट आणि गुटख्याविषयी जागरूकता आणण्यासाठी जसा वैधानिक इशारा देण्यात येतो, त्या धर्तीवर आता प्रत्येक शहरांत खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर सामोसा आणि जिलेबी विषयी जागरूकता आणण्यासाठी बोर्ड लावले जाणार असल्याची शक्यता आहे. खाद्य पदार्थांमध्ये चरबी आणि साखरेच्या स्तराची माहिती देणारे हे फलक असतील.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Weight Loss Secret : Ozempic ने नाही, तर 'या' पदार्थांनी बादशाहने 20 KG वजन केलं कमी, Badshah Diet Rules काय आहेत?

केंद्राच्या आदेशानंतर लावणार फलक...

केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून अशी सूचना देण्यात आल्या आहेत. एआयआयएमएस प्रमाणे केंद्रीय संस्थाने आदींना अशा सूचनांचे फलक खाद्य पदार्थ मिळतात अशा  रेस्टॉरेन्टस, कॅन्टीन आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चटकदार रंगांच्या या फलकांवर या खाद्य पदार्थांमध्ये किती चरबी आणि साखर असते ते लिहिलेले असेल. खाण्याच्या आणि जगण्याच्या वाईट शैलीना अंगीकारल्यामुळे भारतीय शहरांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर जात असल्याचा इशारा आधीच भारतातील वैद्यकीय संस्थांकडून देण्यात येत आहे. 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (ए आय आय एम एस) च्या डॉक्टर अनुसार लोकांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे की ते काय खात आहेत. कारण, ट्रान्स फॅट्स आणि साखर हे आता नवीन तंबाखू आहेत, अर्थात शरीराला अपायकारक असलेल्या तंबाखू सारखेच ट्रान्स फॅट्स आणि साखर अपायकारक आहेत. यामुळे उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर), मधुमेह आणि हृदयरोगाच्या समस्यांना आमंत्रण दिले जाते. 

नक्की वाचा - Cardiac Arrest Vs Heart Attack: कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा..

या शासकीय पत्रामध्ये येत्या 2050 पर्यंत 44 कोटी 90 लक्ष भारतीय स्थूल किंवा लठ्ठ असतील, असा उल्लेख करण्यात आला आहे. आकडेवारी सांगते की आधीच भारतीय शहरांमध्ये पाच प्रौढांपैकी एक व्यक्ती स्थूल आहे. लहान मुलांमध्ये देखील वजनाची समस्या वाढत असून येत्या 2050 पर्यंत भारत लठ्ठपणासाठी जगातील दुसरा देश म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे. अशात हे फलक सावधानतेचा इशारा देणाऱ्या प्रहरींसारखे कार्य करतील अशी अपेक्षा आहे.