
Badshah Weight Loss : रॅपर आणि म्यूजिक प्रॉड्यूसर बादशाह, आपल्या सुपरहिट गाण्यांसाठी ओळखला जातो. यंदाच्या वर्षी तो आपल्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. 39 व्या वर्षी बादशहाने काही महिन्यात तब्बल 20 किलो वजन कमी केलं. त्याने हा वेट लॉस कोणतीही औषधं किंवा शॉर्टकटने केलेला नाही. मार्चमध्ये जेव्हा बादशाह पहिल्यांदा वेट लॉसनंतर (Weight Loss Secret) समोर आला तर अनेकांना धक्का बसला.
काही लोकांनी अंदाज लावला की त्याने Ozempic सारख्या वेट लॉसची औषधी घेतली असावी. मात्र बादशहाने याबाबत नकार दिला आणि आपली वेट लॉस जर्नी चाहत्यांसोबत शेअर केली. शिल्पा शेट्टीच्या वेलनेस शो 'Shape of You' च्या मुलाखतीत बोलताना त्याने वजन कमी करण्याचा गूढ उकललं. बादशाहने सांगितलं की, हा वेट लॉस त्याची मेहनत, मानसित शांतता आणि संतुलित जीवनशैलीचा परिणाम आहे.
Ozempic हे टाइप 2 मधुमेहावर उपचार करण्यासाठी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने मंजूर केलेले औषध आहे. परंतु ते वजन कमी करण्यासाठी देखील अनधिकृतपणे वापरले जाते. मात्र वजन कमी करण्यासाठी बादशहाने कोणतेही औषध घेतले नाही. नियमित वर्फआऊट, क्लीन इटिंग आणि पोर्शन कंट्रोलमुळे वजन कमी झाल्याचं त्याने सांगितलं.
नक्की वाचा - How to shower : आंघोळ करताना सर्वप्रथम शरीरावरील कोणत्या अवयवावर पाणी घ्यावं? आयुर्वेद काय सांगतं?
यादरम्यान मानसिक आरोग्यवरही बादशहाने लक्ष केंद्रीत केलं. तो क्लिनिकल डिप्रेशन आणि तणावाचा सामना करीत होता. मात्र त्याने यावर नियंत्रण आणलं.
बादशहाचा डाएट रुटिन...Badshah Diet Rules
- आहार नियंत्रण: बादशाहने क्रॅश डाएट करण्यापेक्षा खाण्याचं प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलं.
- प्रथि: जास्त खाणे टाळण्यासाठी, त्याने प्रत्येक जेवणाची सुरुवात प्रथिनांनी केली.
- जेवण कधीही स्किप केलं नाही: नाश्त्या दिवसभरातील अत्यंत महत्वाचं अन्न
- वेळेवर पाणी प्या: प्रत्येक जेवणाच्या सुमारे 30 मिनिटे आधी दोन ग्लास पाणी पिणे. त्यामुळे भूक कमी लागते.
- उच्च फायबर: आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि धान्याचा समावेश.
- स्टार्च: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world