Sankashti Chaturthi Feb 2026: सनातन धर्मामध्ये पंचांगाला अतिशय महत्त्व आहे. कोणतेही नवीन कार्य किंवा पूजा-पाठ करताना पंचांग पाहणे महत्त्वपूर्ण मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी ( संकष्टी चतुर्थी) यंदा 5 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पाची उपासना केल्यास संकटांचा नाश होऊन सुख-समृद्धी लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे. द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी (Dwijapriya Sankashti Chaturthi) ही विघ्नहर्ता भगवान गणेशाच्या द्विजप्रिय स्वरूपाला समर्पित असते. संकष्ट या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्ती असा होतो. या दिवशी भाविक व्रत करून गौरीपुत्र गणेशाची मनोभावे पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन इच्छा पूर्ण होतात; असे म्हणतात.
संकष्टी चतुर्थी 2026 वेळ | संकष्ट चतुर्थी 2026 वेळ | Sankashti Chaturthi Feb 2026
दृक पंचांगानुसार, चतुर्थी तिथी 5 फेब्रुवारी रोजी उत्तररात्री 12.09 (AM) वाजता सुरू होईल आणि 6 फेब्रुवारी रोजी उत्तररात्री 12.22 (AM) वाजता समाप्त होईल. या दिवशी चंद्र कन्या राशीत असेल. सूर्योदय सकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी होईल.
शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त: पहाटे 5:22 वाजेपासून ते सकाळी 6:15 वाजेपर्यंत आहे.
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:13 वाजेपासून ते 12:57 वाजेपर्यंत आहे.
विजय मुहूर्त: दुपारी 2:25 वाजेपासून ते 3:08 वाजेपर्यंत आहे.
अमृत काळ: दुपारी 3:32 वाजेपासूनते संध्याकाळी 5:11 वाजेपर्यंत आहे.
अशुभ वेळ (राहुकाल):
राहुकाल: दुपारी 1:57 वाजेपासूनते दुपारी 3:19 वाजेपर्यंत आहे.
यमगंड: सकाळी 7:07 वाजेपासून ते सकाळी 8:29 वाजेपर्यंत आहे.
गुलिक काळ: सकाळी वाजेपासून 9:51 ते सकाळी 11:13 वाजेपर्यंत आहे.
पूजा विधी आणि मंत्र | Sankashti Chaturthi Feb 2026 Puja Vrat
- चतुर्थीच्या दिवशी गजाननाला दुर्वा, लाल फुले, मोदक, लाडू आणि दही-साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.
- गणपतीला सिंदूर आणि तुपाचा लेप लावणे फलदायी ठरते.
- पूजेदरम्यान 'गं गणपतये नमः' आणि 'ओम द्विजप्रियाय नमः' या मंत्रांचा जप करावा.
- तसेच संकष्टनाशन गणेश स्तोत्र आणि गणेश अथर्वशीर्ष पठण करणे शुभ मानले जाते.
शहरानुसार संकष्ट चतुर्थी चंद्रोदय शुभ मुहूर्त | Sankashti Chaturthi Feb 2026 Moonrise
मुंबई रात्री 9.48 वाजता
बीड रात्री 9.35 वाजता
ठाणे रात्री 9.47 वाजता
सांगली रात्री 9.40 वाजता
पुणे रात्री 9.43 वाजता
सावंतवाडी रात्री 9.43 वाजता
रत्नागिरी रात्री 9.45 वाजता
सोलापूर रात्री 9.35 वाजता
कोल्हापूर रात्री 9.41 वाजता
नागपूर रात्री 9.22 वाजता
सातारा रात्री 9.42 वाजता
अमरावती रात्री 9.28 वाजता
नाशिक रात्री 9.44 वाजता
अकोला रात्री 9.31 वाजता
अहिल्यानगर रात्री 9.40 वाजता
छत्रपती संभाजीनगर रात्री 9.38 वाजता
पणजी रात्री 9.43 वाजता
भुसावळ रात्री 9.36 वाजता
धुळे रात्री 9.40 वाजता
परभणी रात्री 9.31 वाजता
जळगाव रात्री 9.37 वाजता
नांदेड रात्री 9.29 वाजता
वर्धा रात्री 9.24 वाजता
धाराशिव रात्री 9.34 वाजता
यवतमाळ रात्री 9.26 वाजता
भंडारा रात्री 9.20 वाजता
चंद्रपूर रात्री 9.21 वाजता
ग्वाल्हेर रात्री 9.27 वाजता
बुलढाणा रात्री 9.34 वाजता
बेळगाव रात्री 9.40 वाजता
इंदौर रात्री 9.36 वाजता
मालवण रात्री 9.44 वाजता
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)