Sankashti Chaturthi Date: संकष्ट चतुर्थी कधी आहे, 8 की 9 नोव्हेंबर? 36 शहरांनुसार चंद्रोदयाची वेळ वेळ वाचा

Sankashti Chaturthi Date And Moonrise Time: नोव्हेंबर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे? चंद्रोदयाची वेळ काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर...

जाहिरात
Read Time: 4 mins
Sankashti Chaturthi Date And Moonrise Time: संकष्टी चतुर्थी कधी आहे, 08 नोव्हेंबर की 09 नोव्हेंबर?
Canva

Sankashti Chaturthi Date And Moonrise Time: हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी गणपती देवतेची पूजा केली जाते. प्रत्येक मंगळवारीही गणपती बाप्पाची विशेष स्वरुपात पूजा केली जाते, कारण हा दिवस बाप्पाचा मानला जातो. यासह प्रत्येक महिन्यातील चतुर्थी तिथी दिवशीही भाविक गणपती बाप्पाची भक्तीसेवा आणि व्रत करतात. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास इच्छा पूर्ण होतात, असे म्हणतात. बाप्पा त्यांच्या भाविकांवर सुख-समृद्धीच्या आशीर्वादाचा वर्षाव करतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी कधी आहे? चंद्रोदयाची वेळ काय आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया...

संकष्ट चतुर्थी 2025 तिथी कालावधी | Chaturthi Tithi Start Date And Chaturthi Tithi End Date November Month

संकष्ट चतुर्थी तिथी प्रारंभ (Chaturthi Tithi Start Date) : 08 नोव्हेंबर 2025, शनिवार सकाळी 7.32 वाजता 
संकष्ट चतुर्थी तिथी समाप्त (Chaturthi Tithi End Date) : 09 नोव्हेंबर 2025, रविवार सकाळी 4.25 वाजता

नोव्हेंबर महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी कधी आहे? | November 2025 Sankashti Chaturthi Date

तिथीनुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत 08 नोव्हेंबर 2025 रोजी केले जाईल. 

शास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीचे व्रताचे पारण चंद्राचे दर्शन घेऊनच केले जाते. 

तुमच्या शहरानुसार जाणून घेऊया चंद्रोदयाची वेळ | November 2025 Sankashti Chaturthi Moonrise Time

  • मुंबई शहर : रात्री 8.44 वाजता
  • नवी मुंबई : रात्री 8.43 वाजता
  • ठाणे : रात्री 8.43 वाजता
  • पालघर : रात्री 8.42 वाजता
  • रायगड : रात्री 8.41 वाजता
  • रत्नागिरी : रात्री 8.47 वाजता
  • सिंधुदुर्ग : रात्री 8.42 वाजता
  • पुणे : रात्री 8.41 वाजता
  • सातारा : रात्री 8.42 वाजता
  • सांगली : रात्री 7.59 वाजता
  • सोलापूर : रात्री 8.34 वाजता
  • कोल्हापूर : रात्री 8.44 वाजता
  • नाशिक : रात्री 8. 37 वाजता
  • धुळे : रात्री 8.31 वाजता
  • नंदुरबार : रात्री 8.32 वाजता
  • जळगाव : रात्री 8.27 वाजता
  • अहिल्यानगर : रात्री 8.36 वाजता
  • नागपूर : रात्री 8.12 वाजता
  • वर्धा : रात्री 8.15 वाजता
  • भंडारा : रात्री 8.10 वाजता
  • गोंदिया : रात्री 8.07 वाजता
  • चंद्रपूर रात्री 8.14 वाजता
  • गडचिरोली रात्री 7.59 वाजता
  • छत्रपती संभाजीनगर : रात्री 8.31 वाजता
  • बीड : रात्री 8.32 वाजता
  • जालना : रात्री 8.29 वाजता
  • लातूर : रात्री 8.29 वाजता
  • परभणी : रात्री 8.27 वाजता
  • हिंगोली : रात्री 8.24 वाजता
  • नांदेड : रात्री 8.25 वाजता
  • धाराशिव : रात्री 8.33 वाजता
  • अमरावती : रात्री 8.18 वाजता
  • अकोला : रात्री 8.22 वाजता
  • बुलढाणा : रात्री 8.26 वाजता
  • वाशिम : रात्री 8.23 वाजता
  • यवतमाळ : रात्री 8.18 वाजता

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Sankashi Chaturthi Wishes | Sankashi Chaturthi Wishes In Marathi

1. विघ्नहर्ता गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होवो 
आनंद, शांती आणि समृद्धीचे किरण 
तुमच्या आयुष्यात सदैव राहो 
गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 
Happy Sankashi Chaturthi 

2. आजच्या या पवित्र दिनी गणरायाच्या चरणी प्रार्थना 
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचे संकटनाशन होवो 
प्रत्येक दिवस नव्या उमेदीने आणि समाधानाने उजळो 
सुख, शांती आणि यशाचा वर्षाव तुमच्यावर सदैव होत राहो 
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा! 
Happy Sankashi Chaturthi 

Advertisement

3. विघ्नहर्ता गणेश तुमच्या घरात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो 
जीवनात कितीही अडचणी आल्या 
तरी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची कायम प्रगती होत राहो
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा! 
Happy Sankashi Chaturthi 

4. गणराय तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करून 
नवी उमेद आणि उर्जेची प्रेरणा देवो
तुमच्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी 
गणपतीचे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहो
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा! 
Happy Sankashi Chaturthi 

Advertisement

5. गणपती बाप्पा तुमचे आयुष्य 
आनंद, आरोग्य आणि यशाने परिपूर्ण करो
संकटांना दूर ठेवून प्रत्येक दिवस साजरा करण्याची शक्ती देवो 
विघ्नहर्त्याची तुमच्यावर अखंड कृपादृष्टी होवो
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा! 
Happy Sankashi Chaturthi 

7. गणपती बाप्पाच्या चरणी नमस्कार करून 
आजच्या दिवशी सर्व दुःख, संकट आणि अडथळे दूर करण्याची प्रार्थना करूया
गणरायाचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! 
Happy Sankashi Chaturthi 

Advertisement

(नक्की वाचा: Tulsi Plant Care: हिवाळ्यात तुळशीचे रोप कसे राहील हिरवेगार? फॉलो करा या 3 टिप्स)

8. तुमचे आयुष्य विघ्नमुक्त, आनंदाने व्यापलेले आणि आरोग्यसंपन्न होवो 
गणरायाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
घरात नेहमी मंगलमय वातावरण राहो
संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
Happy Sankashi Chaturthi 

9. संकष्ट चतुर्थीच्या दिनी गणपती बाप्पाच्या चरणी करा प्रार्थना 
जीवनात सुख, शांती आणि प्रगतीचा प्रकाश येवो
सर्व दिवस आनंद, प्रेम आणि समाधानाने व्यापलेले असो
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Sankashi Chaturthi 

10. गणपती बाप्पा तुमचे आयुष्य 
आनंद, यश आणि समृद्धीने उजळून टाको
तुमच्या सर्व संकटांचे निवारण करून 
नव्या उमेदीने पुढे जाण्याची शक्ती देवो 
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा! 
Happy Sankashi Chaturthi 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)