Sarvat Jast Takat denara Fal konta : फळं आपल्या आयुष्यात केवळ स्वाद आणि गोडवा घेऊन येत नाही तर शारिरीक आणि मानसिक ताकद वाढविण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. योग्य फळं खाल्ल्याने शरीराला आवश्यक विटॅमिन, मिनरल्स, फायबर आणि नैसर्गिकपणे साखर मिळते. ज्यामुळे थकवा कमी होतो. ऊर्जा वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. सध्या बाजारात अनेक फळं उपलब्ध आहेत. मात्र काही फळं अशी असतात ज्यामुळे ताकद आणि ऊर्जा वाढीस लागते.
Best winter fruits | Top 6 Healthiest Fruits:
ही फळं केवळ स्नायू आणि हाडं मजबूत बनवित नाहीत तर मेंदूचं आरोग्य सुधारते. या लेखात आपण त्या फळांबाबत सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. यासोबतच कोणती फळं लगेच ऊर्जा देतात आणि कोणती फळं दीर्घकाळासाठी फायदेशीर आहेत.
सर्वाधिक ताकद देणारी फळं कोणती? | Best Winter Fruits
१ केळं - ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत
केळं नैसर्गिक साखर आणि पोटॅशियमचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे स्नायूंना ताकद मिळते, थकवा कमी येतो आणि दीर्घकाळासाठी ऊर्जा राहते. नाश्त्यात किंवा व्यायामापूर्वी केळं खाणं फायदेशीर ठरू शकतं.
२ आंबा - चवदार आणि शक्तिशाली
फळांचा राजा आंबा कुणाला आवडत नाही. आंब्यात विटॅमिन सी आणि ए मुबलक प्रमाणात असतं. यामध्ये नैसर्गिक साखर आणि अँटीऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आंबा खाल्ल्याने थकवा कमी येतो.
३ डाळिंब - स्नायू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी
डाळिंबात अँटीऑक्सिडेंट आणि लोह मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे रक्तप्रवाह सुरळित होतो. स्नायुंना पोषण मिळतं आणि थकवा कमी येतो. डाळिंबाचं सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
नक्की वाचा - Plant Purifies Air : घरात लावा ही 5 रोपं, स्वस्तात हवा स्वच्छ होईल, महागड्या एअर प्युरीफायरची गरज आता संपली!
४ स्ट्रॉबेरी - लहान मात्र शक्तिशाली
स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर असतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते. स्ट्रॉबेरी लहानसं असलं तरी दीर्घकाळासाठी ताजंतवानं वाटतं.
५ खजूर - दीर्घकाळासाठी ऊर्जा
खजुरात नैसर्गिक साखर आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं. यामुळे ऊर्जा मिळते आणि बराच काळ भूक लागत नाही. लोह आणि मिनरल्समुळे स्नायू आणि हाडांना ताकद मिळते.
६ संत्री - ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती
संत्री विटॅमिन सीचा प्रमुख स्त्रोत आहे. यामुळे थकवा कमी येतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सकाळी रिकाम्या पोटी संत्र खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा राहते.
लक्षात ठेवा -
ही सर्व फळं ताकद वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र लगेचच ऊर्जा हवी असल्यास केळं आणि खजूर सर्वात चांगले. दीर्घकाळापर्यंत शक्ती वाढवण्यासाठी डाळिंब आणि स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात आंबा आणि संत्री शरीराज ताजंतवानं ठेवतात. त्यामुळे विविध फळांचं संतुलित सेवन कऱणं ताकद आणि ऊर्जा वाढविण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.