जाहिरात

Shravan 2026: यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार? जाणून घ्या श्रावणी सोमवारची यादी अन् शिवपूजेची अचूक पद्धत

श्रावण महिना सुरू होताच मंदिरांमध्ये 'बम बम भोले'चा जयघोष आणि कावड यात्रांची धूम पाहायला मिळते.

Shravan 2026: यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार? जाणून घ्या श्रावणी सोमवारची यादी अन् शिवपूजेची अचूक पद्धत
  • श्रावण महिना २०२६ मध्ये ३० जुलैपासून सुरू होऊन २८ ऑगस्ट रोजी श्रावण पूर्णिमेला संपणार आहे
  • या महिन्यात महादेव सृष्टीचा कार्यभार सांभाळतात, त्यामुळे शिवभक्तीचा उत्साह प्रचंड वाढतो
  • महाराष्ट्रात श्रावण महिन्यातील व्रत करणाऱ्या भक्तांसाठी चार महत्त्वाचे सोमवार येतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराच्या भक्तांना या महिन्याची उत्सुकतेने प्रतीक्षा असते. यंदा 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 30 July पासून होत आहे. तर या पवित्र महिन्याची सांगता 28 August 2026 रोजी श्रावण पूर्णिमेला होणार आहे. या काळात संपूर्ण सृष्टीचा कार्यभार स्वतः महादेव सांभाळतात, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळेच या काळात शिवभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. महाराष्ट्रात श्रावण महिना पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. श्रावणानंतर येणारा गणेशोत्सवही महाराष्ट्रात उत्साहाने आणि तेवढ्याच भक्तीभावाने साजरा केला जातो. 

नक्की वाचा - Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! जूनच्या पहिल्या आठवड्यात 'या' राशींना लागणार जॅकपॉट, त्या राशी कोणत्या?

​श्रावणातले चार सोमवार
​यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येणार आहेत. व्रत करणाऱ्या भक्तांसाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. सोमवारची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.

  • ​पहिला सोमवार: 3 August
  • ​दुसरा सोमवार: 10 August
  • ​तिसरा सोमवार: 17 August
  • ​चौथा सोमवार: 24 August

​शिवपूजेची शास्त्रोक्त पद्धत
​श्रावन महिन्यात शिवलिंगावर गंगाजल, दूध आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. अभिषेक केल्यानंतर महादेवाला 11 किंवा 21 बेलपत्र, भांग आणि चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. मानसिक शांततेसाठी या काळात महामृत्युंजय मंत्राचा पठण करणे अत्यंत प्रभावशाली मानले जाते. लाडक्या महादेवाचा सर्वात प्रिय महिना म्हणून श्रावण महिन्याकडे पाहीले जाते. शिवभक्तीत लीन होण्यासाठी देशभरातील भक्त सज्ज झाले आहेत. यंदा 2026 मध्ये 30 July पासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. श्रावण महिना सुरू होताच मंदिरांमध्ये 'बम बम भोले'चा जयघोष आणि कावड यात्रांची धूम पाहायला मिळते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com