शरीराच्या या भागांना सर्वाधिक थंडी का जाणवते? कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क

शरीर तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी (Thermoregulation system) एक विशिष्ट प्रणाली वापरते.

जाहिरात
Read Time: 2 mins

देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीने नुकतीच सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी आता कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांत अनेकदा पांघरुणात शिरल्यावरही आपले हात आणि पाय, विशेषतः बोटे, लगेच गरम होत नाहीत. यामागे अनेकजण विविध कारणे देतात. पण या घटनेमागे एक ठोस विज्ञान आहे. शरीर तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी (Thermoregulation system) एक विशिष्ट प्रणाली वापरते. ज्यामुळे आपल्या हाता-पायांना सर्वाधिक थंडी जाणवते.

शरीराचे तापमान नियंत्रण तंत्र
शरीरामध्ये थंडी जाणवण्याचे मुख्य कारण आहे तापमान नियंत्रण तंत्र. या यंत्रणेचा उद्देश असतो, मेंदू, हृदय आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना त्यांच्या सामान्य तापमानावर, म्हणजे  37°C वर स्थिर ठेवणे. जेणेकरून ते कार्यक्षम राहतील. हे 'कोर ऑर्गन्स' (Core Organs) वाचवण्यासाठी शरीर एक 'प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम' वापरते.

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

रक्तवाहिन्यांचे आकुंचन (Vasoconstriction) आहे मुख्य कारण
थंडीच्या वातावरणात शरीर संरक्षणात्मक उपाय म्हणून 'वाहिकासंकुचन' (Vasoconstriction) करते. याचा अर्थ असा की, हात आणि पाय या extremities मधील रक्तवाहिन्या (Blood Vessels) आकुंचन पावतात किंवा आकसतात. रक्तवाहिन्या आकसल्यामुळे, गरम रक्ताचा प्रवाह हात-पायांकडे कमी होतो. शरीरात उष्णता रक्तामुळेच निर्माण होते, आणि हा प्रवाह कमी झाल्याने हात-पायांना कमी उष्णता मिळते. परिणामी, तेथील तापमान झपाट्याने कमी होते आणि आपल्याला जास्त थंडी जाणवते.

नक्की वाचा - Marriage News: 6 सख्ख्या भावा बहिणींनी आपसात केलं लग्न, त्यामागचं कारण ऐकून पायाखालची वाळू सरकेल

हाता-पायांची शारीरिक रचना
वाहिकासंकुचनाव्यतिरिक्त, हाता-पायांना जास्त थंडी जाणवण्याची आणखी दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे, हे अवयव शरीराच्या मुख्य भागापासून (Core) दूर आहेत, त्यामुळे कमी उष्णता पोहोचते. दुसरे म्हणजे, इतर अवयवांच्या तुलनेत हात-पाय तुलनेने पातळ असतात आणि त्यामध्ये स्नायूंचे प्रमाण (Muscle Mass) कमी असते. स्नायूंचे प्रमाण कमी असल्याने ते स्वतःहून खूप कमी उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे थंडीची जाणीव अधिक तीव्र होते.

Advertisement