Best Places to Sell Old Clothes Online: तुमच्या कपाटात असे अनेक कपडे असतील जे महागडे आणि ब्रँडेड आहेत, पण आता ते तुम्हाला फिट होत नाहीत किंवा त्यांची फॅशन जुनी झाली आहे. हे कपडे वर्षांनुवर्षे कपाटात जागा अडवून ठेवण्यापेक्षा, तुम्ही ते ऑनलाइन विकून चांगली एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकता. अशा 'प्री-लव्ड' (Pre-loved) कपड्यांची बाजारपेठ भारतात झपाट्याने वाढत आहे. भारतात आता अशा अनेक वेबसाइट्स आणि ॲप्स उपलब्ध आहेत जिथे तुम्ही तुमचे जुने, विंटेज किंवा डिझायनर कपडे चांगल्या किमतीत विकू शकता.
Etsy (विंटेज आणि युनिक कपड्यांसाठी)
जर तुमच्याकडे 20 वर्षे किंवा त्याहून जुने विंटेज कपडे असतील किंवा काही दुर्मिळ डिझाइन्स असतील, तर Etsy हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे प्लॅटफॉर्म भारतासह जगभरातील खरेदीदारांशी तुम्हाला जोडते. तुम्हाला फक्त कपड्यांचे चांगले फोटो आणि योग्य माहिती अपलोड करायची आहे.
FreeUp (रोजच्या वापराच्या ब्रँडेड कपड्यांसाठी)
हे एक लोकप्रिय भारतीय ॲप आहे. जर तुमच्याकडे Zara, H&M, Lifestyle यांसारख्या ब्रँड्सचे कपडे असतील, तर तुम्ही ते FreeUp वर सहज विकू शकता. या प्लॅटफॉर्मवर जलद विक्री होण्यासाठी किमती रास्त ठेवणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा- Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
CoutLoot (ट्रेंडी फॅशनसाठी)
CoutLoot हे प्लॅटफॉर्म विशेषतः महिलांच्या फॅशनवर लक्ष केंद्रित करते. इथे ट्रेंडी आणि सध्या फॅशनमध्ये असलेले कपडे खूप लवकर विकले जातात. जर तुमचे कपडे स्टायलिश असतील, तर हे ॲप तुमच्यासाठी उत्तम आहे.
Vestiaire Collective (लक्झरी ब्रँड्ससाठी)
तुमच्याकडे Gucci, Prada किंवा Versace सारख्या आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सचे कपडे किंवा बॅग्स असतील, तर Vestiaire Collective वर तुम्हाला उत्तम ग्राहक मिळतील. हे प्लॅटफॉर्म लक्झरी फॅशन प्रेमींना टार्गेट करते. मात्र, इथे कपड्यांची सत्यता तपासली जाते.
eBay (ग्लोबल डिझायनर वेअरसाठी)
eBay इंडियाचे स्थानिक स्वरूप बदलले असले तरी, भारतीय विक्रेते अजूनही Global eBay वर त्यांचे डिझायनर जॅकेट्स, बॅग्स किंवा 'लिमिटेड एडिशन' वस्तू आंतरराष्ट्रीय स्तरावर विकू शकतात.
कपडे विकताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा
- कपड्यांचे फोटो स्पष्ट आणि नैसर्गिक प्रकाशात काढा.
- कपड्यावर काही डाग किंवा फाटलेले असेल तर ते प्रामाणिकपणे सांगा.
- ब्रँडचे नाव आणि अचूक साईज नमूद करा.
- कपड्याची अवस्था बघून स्पर्धात्मक किंमत ठेवा.
- कपडे विकण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून आणि इस्त्री करून पॅक करा.