Shani Jayanti 2026 Date and Time: शनी जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आज (16 मे) शनी जयंतीचा देशभरात सण साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र शनी देव यांचा जन्म झाला होता. हा सण शनैश्चर जयंती आणि शनी अमावस्या म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी कर्मफलदाता शनी देवांची पूजा करणे फलदायी मानले जाते. शनी देवाच्या पूजेने आणि आशीर्वादाने माणसाच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, यश आणि आरोग्य निरोगी राहते, अशी श्रद्धा आहे.
शनी जयंती 2026 तिथी | Shani Jayanti 2026 Shubh Tithi
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी आज म्हणजेच 16 मे रोजी पहाटे 5 वाजून 11 मिनिटांनी आरंभ झाली आहे. तर या तिथी 17 मे रोजी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी समाप्त होईल. अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार शनी जयंती (16 मे) शनिवार रोजी साजरी केली जात आहे.
(नक्की वाचा : Shani Jayanti 2026 Date: शनी देवाचा प्रकोप टाळायचाय? शनी जयंतीला कशी करावी पूजा आणि व्रत? जाणून घ्या माहिती)
शनी जयंती 2026 शुभ मुहूर्त | Shani Jayanti 2026 Shubh Muhurat
- ब्रह्म मुहूर्त: पहाटे 4 वाजून 7 मिनिटे ते पहाटे 4 वाजून 48 मिनिटांपर्यंत आहे.
- अभिजीत मुहूर्त: दुपारी 11 वाजून 50 मिनिटे ते दुपारी 12 वाजता 45 मिनिटांपर्यंत आहे.
- विजय मुहूर्त: दुपारी 2 वाजून 34 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत आहे.
- अमृत काळ: दुपारी 1 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 40 मिनिटांपर्यंत आहे.
- गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 7 वाजून 4 मिनिटे ते संध्याकाळी 7 वाजून 25 मिनिटांपर्यंत आहे.
शनी जयंतीला पूजा कशी करावी?
- सूर्योदयापूर्वी उठून स्नानध्यान केल्यानंतर पूजेचा आणि व्रताचा संकल्प करावा.
- शनी जयंती व्रताच्या पूजेसाठी शनी मंदिर हे सर्वात उत्तम स्थान मानले जाते.
- जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात शनी देवाचा फोटो ठेवून विधीवत पूजा करावी.
- पूजेमध्ये सर्वप्रथम शनी देवाच्या फोटोवर किंवा मूर्तीवर गंगाजल किंवा पवित्र जल शिंपडावे.
- यानंतर शनी देवांना मोहरीच्या तेलाने विशेष अभिषेक करावा.
- त्यानंतर शनी देवांना धूप, दीप, फुले नैवेद्य इत्यादी अर्पण करावे.
- शनी जयंतीच्या पूजेमध्ये साधकाने प्रामुख्याने कणकेचा (गव्हाच्या पिठाचा) चौमुखी दिवा लावून ठेवावा.
- यानंतर शनी चालीसा, स्तोत्र इत्यादींचे पठण करावे आणि त्यांच्या 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
- शनी जयंती व्रताच्या पूजेच्या शेवटी शनी देवांची विधीवत आरती करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)