Sharad Purnima 2025 Upay : आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी 'शरद पौर्णिमा' आणि 'कोजागरी पौर्णिमा' या नावानेही ओळखली जाते. यंदा 06 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी चंद्र, लक्ष्मीमाता, इंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. कोजागरी पौर्णिमेला विधीवत पूजा केल्यास आपल्यावर लक्ष्मीदेवीची कृपादृष्टी होते, असे म्हणतात. सुख-समृद्धीचा वर्षाव होण्यासाठी शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणते सात उपाय करावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
शरद पौर्णिमेचे उपाय | Sharad Purnima 2025 Upay | Kojagari Purnima 2025
1. शरद पौर्णिमेचा पहिला उपाय :
शरद पौर्णिमेच्या दिवशी लाभ मिळवण्यासाठी विधीवत व्रत करावे. व्रत केल्यास लक्ष्मीमातेची कृपादृष्टी कायम राहते आणि सुख-समृद्धीचाही वर्षाव होतो, असे म्हणतात.
2. शरद पौर्णिमेचा दुसरा उपाय :
कोजागरी पौर्णिमेच्या पूजेचे लाभ मिळवण्यासाठी चंद्र देवतेची पूजा करुन त्यांच्या मंत्राचा विशेष स्वरुपात जप करावा.
3. शरद पौर्णिमेचा तिसरा उपाय :
शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवतेचे दर्शन करणे आणि पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्र देव त्यांच्या पूर्ण आणि तेजस्वी स्वरुपात असतात. या दिवशी चंद्र देवतेला चांदीच्या पेल्यामध्ये दूध किंवा पाणी अर्पण केल्यास कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूते होते आणि शुभ फळ मिळतात, असे म्हणतात.
4. शरद पौर्णिमेचा चौथा उपाय :
शरद पौर्णिमेचा धनाची देवी लक्ष्मीमातेची संबंध असतो. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीमाता "कोण जागे आहे?" असे विचारते आणि जागा असणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देते. म्हणूनच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विधीवत देवीची पूजा करतात, जागरण करुन मंत्रांचा जप करतात. जागरण केल्यास वर्षभर घरामध्ये समृद्धी नांदते, असे म्हणतात.
5. शरद पौर्णिमेचा पाचवा उपाय :
शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीमातेची कृपा मिळवण्यासाठी विशेष स्वरुपात श्री सूक्त किंवा कनकधारा स्त्रोताचे पठण करावे. यामुळे आर्थिक संकटं दूर होण्यास मदत मिळू शकते.
6. शरद पौर्णिमेचा सहावा उपाय :
शरद पौर्णिमाच्या रात्री पवित्र जलतीर्थावर स्नान-दान करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विशेष आशीर्वाद मिळतो, असे म्हणतात.
7. शरद पौर्णिमेचा सातवा उपाय :
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र प्रकाशसह अमृत तत्त्वांचा वर्षाव होतो, असे म्हणतात. ही तत्त्व प्राप्त करण्यासाठी चंद्र प्रकाशात खीर ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ली जाते. ही खीर खाल्ल्यास सुख-समृद्धीसह निरोगी आरोग्याचा आशीर्वाद मिळतो, असेही म्हणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)