Navratri 2024: नवरात्रौत्सवातील अष्टमी-नवमीची पूजा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त 

Ashtami and Navami Date Puja Muhurta: यंदाच्या नवरात्रौत्सवातील अष्टमी आणि नवमी तिथीसंदर्भात भाविकांमध्ये गोंधळ आहे. चिंता करू नका आपण योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins

Ashtami Navami Puja Vidhi And Muhurat: पंचांगानुसार शारदीय नवरात्रौत्सवाचा (Navratri 2024) शुभारंभ दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होतो आणि या उत्सवाची सांगता नवमी तिथीला होते. यंदा नवरात्रौत्सवाची सुरुवात 3 ऑक्टोबरला झाली असून याची सांगता 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर काही ठिकाणी देवीमातेचे विसर्जन 12 ऑक्टोबरला तर कुठे 13 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. दरम्यान यंदा भाविकांमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीसंदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. या लेखाद्वारे आपण अष्टमी आणि नवमी तिथीची योग्य तारीख तसेच शुभ मुहूर्त जाणून घेऊया...

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

अष्टमी तिथी कधी आहे? (When is Ashtami Tithi)

पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्रौत्सवातील अष्टमी तिथीचा शुभारंभ 10 ऑक्टोबरला दुपारी 12. 31 वाजता होत आहे आणि  दुसऱ्या दिवशी 11 ऑक्टोबरला 12.06 वाजेपर्यंत तिथी समाप्त होईल. यानंतर लगेचच नवमी तिथीचा शुभारंभ होईल. नवमी तिथीचा शुभारंभ 12 ऑक्टोबरला सकाळी 10.57 वाजता होईल. उदया तिथीमुळे अष्टमी आणि नवमी तिथीचे व्रत 11 ऑक्टोबरलाच केले जाईल. 

(नक्की वाचा: कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव, 3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत या विशेष कार्यक्रमांचे आयोजन)

अष्टमी आणि नवमी तिथीचा पूजा मुहूर्त (Ashtami And Navami Date Puja Muhurta)

- पंचांगानुसार 11 ऑक्टोबर 2024 रोजी पूजा मुहूर्त सकाळी 6 वाजून 20 मिनिटांपासून ते सकाळी 7 वाजून 47 मिनिटांपर्यंत आहे. 
- अमृत मुहूर्त सकाळी 9 वाजून 14 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे. 

Tuljabhavani| तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा संपन्न, देवीचं मनमोहक रुप पाहण्यासाठी गर्दी