Shiv Jayanti 2026 Speech In Marathi: सह्याद्रीच्या कडेकपारीतून आजही ज्यांच्या नावाचा जयजयकार घुमतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे केवळ एक तारीख नव्हे, तर तो प्रत्येक मावळ्याच्या उरातील स्वाभिमानाचा हुंकार आहे. शिवजयंतीनिमित्त दिलेले भाषण हे केवळ शब्द नसून, ते शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराजांचे कर्तृत्व, त्यांचे युद्धकौशल्य आणि त्यांनी जपलेली नीतिमत्ता भावी पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. तुमची मुलं शाळा किंवा कॉलेजमध्ये शिवजयंतीनिमित्त भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होणार असतील, तर या लेखातील माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
शिवजयंती 2026 भाषण टीप्स | Shiv Jayanti 2026 Speech In Marathi | Shiv Jayanti 2026 Speech Ideas
1. Shiv Jayanti 2026 Speech 1: रयतेचा राजा
व्यासपीठावरील वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रांनो...
"निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी..."
आज 19 फेब्रुवारी! केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर अवघ्या जगाचा राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026) जन्मोत्सव. महाराजांनी फक्त गड-किल्ले जिंकले नाहीत, तर त्यांनी लोकांची मने जिंकली. ज्या काळात सामान्य जनता गुलामगिरीत जगत होती, त्या काळात शिवरायांनी स्वराज्य हा शब्द प्रत्येकाच्या मनात पेरला. महिलांचा सन्मान, रयतेचा राजा आणि गनिमी कावा हीच त्यांच्या विजयाची सूत्रे होती. आजही व्यवस्थापन आणि नेतृत्वाचा विषय निघतो, तेव्हा जगात महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. आपण त्यांचे फक्त फोटो न लावता, त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे.
एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय भवानी, जय शिवाजी! | Best speech on Shivaji Maharaj in Marathi
2. Shiv Jayanti 2026 Speech 2: शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा
उपस्थित सर्व शिवप्रेमींना माझा मानाचा मुजरा...
आज आपण अशा राजाची जयंती साजरी करत आहोत, ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले. जेव्हा दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही दिशांनी मुघल आणि आदिलशाहीसारखी महासत्ता महाराष्ट्रावर अन्याय करत होती, तेव्हा मावळ प्रांतात एक वाघ जन्माला आला. हाताशी फक्त मूठभर मावळे घेऊन महाराजांनी जुलमी सत्तेला आव्हान दिले. अफझलखानाचा वध असो किंवा पन्हाळ्याचा वेढा, महाराजांच्या चातुर्याने प्रत्येक संकटावर मात केली. महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, तर महाराज म्हणजे वर्तमान आणि भविष्य आहे. आजच्या तरुणांनी महाराजांकडून कष्टाची आणि धैर्याची शिकवण घेतली पाहिजे.
धन्यवाद!
छत्रपती शिवाजी महाराज की जय! | Shiv jayanti 2026 Speech in Marathi
व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो...
आजच्या दिवशी शिवनेरीवर सनई-चौघड्यांचा निनाद झाला आणि स्वराज्याला तारणहार मिळाला. पण शिवराय घडण्यामागे सर्वात मोठा वाटा होता तो म्हणजे राजमाता जिजाऊ यांचा. जिजाऊंनी बालपणी शिवबांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यात शौर्य, पराक्रमाची माहिती दिली. त्यांनी शिकवले की, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. म्हणूनच महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. एक आदर्श पुत्र आणि एक आदर्श राजा कसा असावा, हे पाहायचे असेल तर शिवरायांच्या आयुष्यापेक्षा दुसरे मोठे पुस्तक नाही.
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जय शिवराय! | Shiv jayanti 2026 Speeches Ideas in Marathi
(नक्की वाचा: Shiv Jayanti 2026 : शिवजयंती वर्षातून दोनदा का साजरी होते? तुम्हाला माहिती आहे का खरे कारण?)
4. Shiv Jayanti 2026 Speech 4: गनिमी कावा आणि सैन्य व्यवस्थापनउपस्थित मान्यवरांना माझा मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज यांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' असे म्हटले जाते. महाराजांनी डोंगरदऱ्यांचा अभ्यास करून 'गनिमी कावा' ही युद्धनीती विकसित केली. मोठ्या सैन्याला कमी मावळ्यांच्या मदतीने कसे हरवायचे, याचे गणित जगाला शिवरायांनी शिकवले. त्यांनी सागरी किल्ले बांधून परकीय आक्रमणांना रोखले. महाराजांच्या सैन्यात जात-पात नव्हती, तर फक्त एकच धर्म होता, तो म्हणजे स्वराज्य. आजही अमेरिकेसारखी राष्ट्रे गनिमी कावा या युद्धनीतीचा अभ्यास करतात. आपण अशा महान राजाच्या महाराष्ट्रात राहतो, ही आपली सर्वात मोठी भाग्यवान गोष्ट आहे.
तुमच्या रक्ताने आणि घामाने स्वराज्याची सेवा करा, हाच शिवरायांचा खरा संदेश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र! |Motivational speech on Shivaji Maharaj
माझ्या शिवभक्त मित्रांनो...
आज सर्वत्र भगवे झेंडे आणि गुलाल दिसत आहे, पण शिवरायांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र आपण घडवतोय का? हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे. शिवजयंती म्हणजे फक्त डीजेवर नाचणे किंवा गाणी लावणे नव्हे. शिवजयंती म्हणजे महिलांचा आदर करणे, व्यसनांपासून दूर राहणे आणि संकटात सापडलेल्या गरिबांना मदत करणे होय. महाराजांनी गड-किल्ले जिंकले, आपण आता ज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची शिखरे काबीज केली पाहिजे. चला, आज या पवित्र दिवशी शपथ घेऊया की, आपण महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक जबाबदार नागरिक बनूया.
शेवटी एवढेच म्हणेन- 'श्वासात राजा, ध्यासात राजा, महाराष्ट्राच्या काळजात राजा!'
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world