Ajit Pawar Death: अजित पवार विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari News) यांनी या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर बोट ठेवत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवारांच्या विमानाचा मागील भाग पूर्णपणे सुस्थितीत आहे, त्यामुळे ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होतोय की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा सवाल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारलाय आणि #JusticeForDada हा हॅशटॅग वापरून न्यायाची मागणी केली आहे.
#justice for Dada : अमोल मिटकरी
आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलंय की, "विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?#justice for Dada"
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाचीटेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या… pic.twitter.com/RelNneoBxd
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 17, 2026
(नक्की वाचा: Sunetra Pawar Emmanuel Macron Viral Video: मॅक्रॉन आणि सुनेत्रा पवारांमध्ये काय बातचीत झाली? भेटीचा VIDEO पाहिलात का?)
ब्लॅक बॉक्स कधी जळू शकतो किंवा नष्ट होऊ शकतो?
याबाबतही अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की, "अत्यंत आग / उष्णता: अपघातानंतर लागलेली आग जर 1,100°C पेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक - विशेषतः फ्लॅश मेमरी — उष्णतेमुळे खराब होऊ शकतात. अत्यंत जोराचा धक्का: 3,400 Gs पेक्षा जास्त धक्का (जो सामान्य, अगदी प्राणघातक अपघातांपेक्षाही खूप जास्त असतो) बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
पर्यावरणीय घटक: खोल समुद्रात दीर्घकाळ मीठ पाण्यात राहिल्यास गंज (corrosion) होऊ शकतो आणि त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, ब्लॅक बॉक्स 30 दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असतो.#justice for Dada"
सर्व सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणीब्लॅक बॉक्स कधी जळू शकतो किंवा नष्ट होऊ शकतो?
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 16, 2026
अत्यंत आग / उष्णता: अपघातानंतर लागलेली आग जर 1,100°C पेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक — विशेषतः फ्लॅश मेमरी — उष्णतेमुळे खराब होऊ शकतात.
अत्यंत जोराचा धक्का: 3,400 Gs पेक्षा जास्त धक्का…
यापूर्वी अमोल मिटकरी यांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आणण्याची मागणी केली होती. अमोल मिटकरी म्हणाले होते की, "ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण ! आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व “लवकरच” विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो. आम्ही वाट पाहू पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज ,पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिक मध्ये अडकले , त्या ठिकाणचे cctv फुटेज व सर्व या पायलटचा २८ जानेवारी २०२६ चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती" या पोस्टमध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांनाही टॅग केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world