Lung Cancer Risk: धक्कादायक! फळे आणि पालेभाज्या ठरतायत फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत?

Lung Cancer Risk: धूम्रपान न करणाऱ्या 50 वर्षांखालील तरुणांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग वाढण्यामागे फळे, भाज्या आणि कडधान्ये कारणीभूत ठरत असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

"आरोग्यदायी आहार घ्या आणि आजारांपासून दूर राहा," हा सल्ला आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत. मात्र, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या (USC) संशोधकांनी सादर केलेल्या एका अहवालाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. धुम्रपान न करणाऱ्या आणि 50 वर्षांखालील तरुणांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) वाढण्यामागे त्यांनी फळे, भाज्या आणि कडधान्यांचा संबंध जोडला आहे.

भाज्या नव्हे, कीटकनाशके आहेत शत्रू

संशोधकांनी स्पष्ट केले की, खुद्द भाज्या किंवा फळे कर्करोगाला कारणीभूत नसून, त्यावर फवारली जाणारी कीटकनाशके (Pesticides) धोकादायक आहेत. आता पिकवल्या जाणाऱ्या फळांवर आणि भाज्यांवर मांस किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत कीटकनाशकांचे अंश जास्त असतात. या संशोधनात सहभागी झालेल्या महिलांमध्ये 'हेल्दी ईटिंग इंडेक्स' चा स्कोअर सरासरी भारतीयांपेक्षा जास्त होता, म्हणजेच त्या आरोग्यदायी आहार घेत होत्या. मात्र, तरीही त्यांना कर्करोगाची लागण झाल्याचे दिसून आले.

(नक्की वाचा- Job News: नोकरी ठरतेय जीवघेणी! दरवर्षी 8 लाखांहून अधिक मृत्यू; कारणंही तितकंच चिंताजनक)

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

ज्या तरुणांनी कधीही धूम्रपान केले नाही, अशा रुग्णांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोग निदान होण्यापूर्वी हे रुग्ण सरासरी अमेरिकन नागरिकांपेक्षा जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या, शेंगा आणि कडधान्ये खात होते. कीटकनाशकांच्या संपर्कात येणाऱ्या शेतमजुरांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण आधीच जास्त आहे, तोच कल आता शहरी ग्राहकांमध्ये दिसत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

तज्ज्ञांचं म्हणणं काय?

केके मेडिसिनमधील संशोधक डॉ. जॉर्ज निवा यांच्या मते, "फुफ्फुसाच्या कर्करोगाचा एक मोठा गट असा आहे ज्यांचे आजार ओढवण्यामागे धूम्रपान हे कारण नाही. वायू प्रदूषण आणि हार्मोन्समध्ये बदल घडवून आणणारी रसायने यांसोबतच आता 'डाएट' हा देखील एक महत्त्वाचा घटक समोर येत आहे." विशेषतः 50 वर्षांखालील महिलांमध्ये हा कल चिंताजनक रितीने वाढत आहे. हे संशोधन 'अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च'च्या वार्षिक बैठकीत मांडण्यात आले. 
 

Topics mentioned in this article