Shravan 2025 Horoscope : श्रावण महिन्याचे राशीभविष्य! नोकरी, व्यवसाय, आरोग्य, आर्थिक जीवन कसे असेल? जाणून घ्या उपाय

Shravan 2025 Horoscope : श्रावण महिना कोणत्या राशीसाठी कसा ठरणार आहे? जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेली माहिती…

जाहिरात
Read Time: 6 mins
"Shravan 2025 Horoscope : श्रावण महिन्यातील राशीभविष्य"

Shravan 2025 Horoscope : श्रावण महिन्यास 25 जुलैपासून शुभारंभ झाला आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यास आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या सण-उत्सवांचे विशेष महत्त्व आहे. 23 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असणार आहे. त्यामुळे हा महिना प्रत्येक राशीसाठी कसा असणार आहे, कोणत्या राशीला कशा पद्धतीने  फलप्राप्ती होईल, आर्थिक जीवन कसे असेल, नोकरीमध्ये कोणते बदल होतील, कोणत्या गोष्टींपासून काळजी घ्यावी आणि समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय करावे? याबाबत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलद्वारे दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया…

श्रावण महिन्याचे राशीभविष्य (Shravan Month Horoscope 25th July To 23rd August Rashibhavishya)

मेष रास (Aries Zodiac Sign)

मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र फळे देणारा असणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये जुन्या गोष्टी उकरून काढणे टाळावे. नोकरीमध्ये कामाचा वेग वाढेल. नोकरीच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळतील, त्या संयमाने हाताळा. व्यवसायामध्ये नव्या योजना आखण्याचा विचार करू शकता, पण मोठी आर्थिक जोखिम कटाक्षाने टाळा. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने अंगदुखी आणि थकवा जाणून शकतो. महिन्याच्या मध्यावर एखादी आनंदाची गोष्ट ऐकायला मिळेल.

उपाय : गणेश सहस्त्रनाम स्त्रोत्राचे दररोज पठण करावे.

वृषभ रास (Taurus Zodiac Sign)

वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना मानसिक ताण देणारा ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता विचारांमध्ये ठेवा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीमध्ये वरिष्ठांचे लक्ष जाईल, त्यामुळे काही संधी तुम्हाला मिळू शकतील. व्यवसायामध्ये लाभदायक करार होण्याची शक्यता आहे, पण सर्व कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करावी. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्यावे, अनावश्यक खर्च टाळावा. थंड पेय किंवा बाहेरचे दुषित अन्न खाल्ल्यामुळे आजार होऊ शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची काळजी करण्याचे कारण नाही, प्रयत्न सुरू ठेवा. 

उपाय : कुलदेवीची उपासना किंवा कुलदेवीच्या नाममंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. 

मिथुन रास (Gemini Zodiac Sign)

मिथुन राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना सामान्यच राहणार आहे. कौटुंबिक वातावरण सौम्य राहील, पण संवाद वाढवण्यावर भर द्यावा. नोकरीत नवनवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्यामुळे कामाचा ताण जाणवू शकतो. वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. साधारणपणे दुसऱ्या आठवड्यात व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळतील, त्याविषयी जाणकारांचा सल्ला नक्की घ्यावा. आर्थिक स्थिती सामान्य राहील. आकस्मिक खर्च संभवू शकतील. आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Advertisement

उपाय : विष्णुसहस्त्रनाम स्त्रोताचे दररोज पठण करावे.

कर्क रास (Cancer Zodiac Sign)

कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना समाधानकारक असणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अतिशय उत्तम काळ आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल पण ऑफिसमध्ये राजकारणापासून दूर राहणे अतिशय आवश्यक आहे. व्यवसायात स्थिरता राहील. नवीन भागीदारीची शक्यता आहे. आर्थिकबाबतीत तुमचे उत्पन्न वाढू शकते. पण खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेचे गरजेचे आहे. वाढत्या कामांमुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी योगसाधना किंवा ध्यानधारणा नक्की करा. चांगले छंद जोपासावे. 

उपाय : चंद्रकवच स्त्रोत्राचे दररोज पठण करावे. 

सिंह रास (Leo Zodiac Sign)

सिंह राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना काहीसा धावपळीचा जाण्याची शक्यता आहे.  कौटुंबिक मतभेद शांतपणे सोडवा. गरज पडल्यास थोडीशी माघार घ्यावी आणि स्पष्टवक्तेपणापासून थोडेसे दूर राहा. नोकरीमध्ये बढती किंवा संधी मिळण्याचे योग आहेत. तुमची मेहनत या महिन्यामध्ये नक्की दिसून येईल. व्यवसायामध्ये विस्ताराचे संकेत दिसत आहेत, पण त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. पण मोठ्या गुंतवणुकीपासून सध्या दूर राहिलेले बरे. आरोग्याच्या दृष्टीने फारशी चिंता करण्याचे कारण नाही. शक्य तितका वेळ मित्रपरिवारासोबत घालवा.

Advertisement

उपाय : आदित्यहृदय स्त्रोत्राचे पठण करावे.

कन्या रास (Virgo Zodiac Sign)

कन्या राशीसाठी हा महिना थोडासा डोकेदुखी वाढवणारा असण्याची शक्यता आहे. घरातील तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील पण तुमचे नियोजन चांगले असेल तर सर्व काही सुरळीत पार पडेल. नोकरीमध्ये अचूकतेकडे लक्ष द्या. लहान-लहान चुका टाळा. व्यवसायामध्ये कायदेशीर बाबी तपासून घ्या, अन्यथा त्रास होऊ शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील. खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने शेवटचे दोन आठवडे त्रासदायक ठरू शकतात. आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.  

उपाय :  श्री विष्णवे नमः या मंत्राचा  जप करावा.

तूळ रास (Libra Zodiac Sign)

तूळ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना संमिश्र राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होतील. जोडीदाराशी या महिन्यामध्ये संवाद वाढवा. नोकरीमध्ये तुमच्या कल्पकतेचा विचार होईल. नवीन प्रकल्पांमध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. व्यवसायात वाढ होईल पण भागीदारासोबत स्पष्ट व्यवहार ठेवा. आर्थिक स्थिती बळकट होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास असणाऱ्या लोकांना महिन्याच्या मध्यावर किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.

Advertisement

उपाय :  श्री दुर्गायै नमः या मंत्राचा जप करावा. 

(नक्की वाचा: Shravan 2025 Wishes In Marathi: भक्तीचा उत्सव फुलला, श्रावण मास आला! श्रावण मासारंभाच्या पाठवा खास शुभेच्छा)

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Sign)

वृश्चिक रास असणाऱ्या लोकांसाठी श्रावण महिना काहीसा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. घरामध्ये संवाद कमी झाल्यास गैरसमज या काळामध्ये वाढू शकतात. त्यामुळे मन मोकळे करण्याचा प्रयत्न करावा. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे. व्यवसायामध्ये धीर धरावा. मोठे निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर ते पुढे ढकलणे उत्तम ठरेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च संभवतो. त्यामुळे पैशांचे नियोजन ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर डोकेदुखी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. पण समस्या फार काळ टिकणार नाहीत, हे विसरू नका. 

उपाय : संकटनाशन गणपती स्त्रोत्राचे पठण करा. 

धनु रास (Sagittarius Zodiac Sign)

धनु राशीसाठी श्रावण महिना समाधानकार ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत प्रवास किंवा सहलीचा बेत आखला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरीत नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी तुम्हाला मिळेल. प्रगतीचा मार्ग या काळामध्ये खुला होईल. व्यवसायात दूरस्थ संपर्कातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारेल पण जुने कर्ज फेडण्यावर भर द्यावा. आरोग्याच्या दृष्टीने महिना सामान्य ठरणार आहे. विवाह इच्छुक लोकांना सकारात्मक बातमी मिळू शकते. 

उपाय :  बृहस्पतीकवच स्त्रोत्राचे पठण करा. 

मकर रास (Capricorn Zodiac Sign)

मकर राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना मिश्र फळे देणारा असणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीत तुमच्या कष्टाचे कौतुक होईल पण कामाचा भार देखील तितकाच वाढेल. व्यवसायात सावध पावले उचला. नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ येतोय त्यामुळे थोडेसे थांबा. आर्थिक स्थिती स्थिर राहील. पण अचानक होणाऱ्या खर्चासाठी देखील तयार राहा. सांध्यांचा किंवा हाडांचा त्रास असल्यास महिन्याच्या शेवटी तक्रारी जाणवू शकतात. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महिन्याच्या शेवटी समानधानकारक बातमी मिळू शकते. 

उपाय : शनी माहात्म्याचे पठण करा. 

कुंभ रास (Aquarius Zodiac Sign)

कुंभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना नवीन सधी घेऊन येतोय. सामाजिक संबंध वाढतील, नवीन लोकांच्या तुमच्या या काळात ओळखी होतील. नोकरीत सर्जनशील कल्पनांचा वापर करुन तुम्हाला यश मिळेल. नावीन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. व्यवसायात तंत्रज्ञानाचा योग्य वापर फायदेशीर ठरेल. जुन्या प्रकरणात अडकलेले पैस पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील. 

उपाय : भीमरूपी स्त्रोत्र किंवा हनुमान चालीसा स्त्रोत्राचे पठण करावे.

मीन रास (Pisces Zodiac Sign)

मीन राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्यात घरातील वातावरण सकारात्मक आणि समाधानकारक राहील. प्रियजनांशी संवाद  वाढवा. नोकरी करत असाल तर त्यामध्ये स्थिरता राहील. पण अधिक सक्रिय राहणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये सध्या मोठे निर्णय टाळा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. आर्थिक बाबतीत संयम ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणतेही खर्च या महिन्यात करू नका. आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ तक्रारी जाणवतील. 

उपाय : श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)