सावधान! दिवसभरात 4 ते 5 कप चहा पिताय? शरीरात 'या' 2 व्हिटॅमिन्सची होतेय कमतरता, डॉक्टरांची धक्कादायक माहिती

Side Effects Of Drinking Too Much Tea: जास्त चहा प्यायल्याने शरीरात महत्त्वाच्या दोन व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ शकते. चहा पिण्याचे दुष्परिणाम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता टाळण्यासाठी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अमित मिगलानी यांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स वाचा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Side Effects Of Drinking Too Much Tea: जास्त चहा पिण्याचे फायदे"
Canva

Side Effects Of Drinking Too Much Tea: सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही चार ते पाच कप चहा पित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तज्ज्ञांच्या मते, आवश्यकतेपेक्षा जास्त चहा पिणे हे केवळ ॲसिडिटी किंवा झोपेशी संबंधित समस्याच वाढवत नाही तर शरीरात व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) आणि लोह (Iron - लोह) यासारख्या आवश्यक पोषक तत्त्वांच्या कमतरतेचे कारणही बनू शकते.

चहा प्यायल्याने कोणत्या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते?

तुम्हाला माहीत आहे का की चहाचे पिण्याची सवय आपल्या शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सवरही परिणाम करते. अतिप्रमाणात चहा प्यायल्याने शरीरात काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता निर्माण होऊ शकते. याविषयी अधिक माहितीसाठी एनडीटीव्हीने (NDTV) डॉ. अमित मिगलानी यांच्याशी संवाद साधला, जे एशियन हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (पोटाचे आणि आतड्यांचे विकार) विभागाचे डायरेक्टर आणि एचओडी (HOD) आहेत. चला त्यांच्याकडून जाणून घेऊया की जास्त चहा प्यायल्याने शरीरात कोणत्या व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण होऊ शकते. 

Advertisement

चहा प्यायल्याने होणारे शरीराचे नुकसान आणि व्हिटॅमिनची कमतरता (Harmful Effects of Drinking Tea and Vitamin Deficiency)

1. व्हिटॅमिन बी12 आणि लोहची कमतरता

चहामध्ये असलेले टॅनिन (Tannins) आणि कॅफिन (Caffeine) शरीरात व्हिटॅमिन B12 शोषण घेण्याची प्रक्रिया रोखतात. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, स्मरणशक्तीच्या समस्या आणि मूड स्विंग्स होऊ शकतात. जेवणानंतर लगेचच चहा प्यायल्याने लोहाचे शोषण कमी होते. डॉ. अमित मिगलानी यांच्या मते, व्हिटॅमिन सी हे लोह शरीरात चांगले शोषून घेण्यास मदत करते, पण चहामुळे या प्रक्रियेवर दुष्परिणाम होतात. यामुळे ॲनिमियाची समस्या निर्माण होऊ शकते. 

(नक्की वाचा: Egg Benefits: 1 दिवसात किती उकडलेली अंडी खावी? अंड्यामध्ये किती प्रोटीन असते? वाचा न्युट्रिशनिस्टने दिलेली माहिती)

2. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता

जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास शरीरातून कॅल्शिअम बाहेर फेकले जाते. यामुळे हाडे कमकुवत होतात आणि व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते. जास्त चहा प्यायल्याने ऑस्टिओपोरोसिसचा (Osteoporosis) धोका वाढू शकतो.

(नक्की वाचा: High Uric Acid: हाय युरिक ॲसिड समस्या असताना प्रोटीनची कमतरता कशी दूर करावी? या 3 गोष्टी ठरतील ब्रह्मास्त्र)

जास्त चहा पिण्याचे इतर तोटे

  • झोप लागण्यास त्रास: कॅफिन झोपेवर परिणाम करते, ज्यामुळे निद्रानाशाची समस्या होऊ शकते.
  • पोटाच्या समस्या: ॲसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या वाढू शकतात.
  • हृदयाची धडधड वाढणे: विशेषतः हाय बीपी असलेल्या लोकांमध्ये कॅफिनच्या जास्त प्रमाणामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात.

व्हिटॅमिन्सच्या कमतरतेपासून कसे वाचायचे?

  • जेवल्यानंतर लगेचच चहा पिऊ नका, कमीत कमी एक ते दोन तासांचे अंतर ठेवा.
  • दिवसातून दोन ते तीन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नका.
  • हर्बल टी किंवा ग्रीन टीचा पर्याय निवडा.
  • व्हिटॅमिन्सयुक्त आहाराचे जास्त प्रमाणात सेवन करा, उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध आणि दही.

डॉ. अमित मिगलानी यांनी सांगितले की, चहा प्यायल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि मूडही सुधारण्यास मदत मिळते. पण जेव्हा याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते, तेव्हा तो शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. विशेषतः व्हिटॅमिन्सची कमतरता ही एक गंभीर समस्या बनू शकते, जी हळूहळू शरीराला कमकुवत करते. म्हणूनच चहा मर्यादित प्रमाणात प्यावा. 

Advertisement

(डॉ. अमित मिगलानी हे फरिदाबाद येथील एशियन हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (पोटाचे आणि आतड्यांचे विकार) विभागाचे डायरेक्टर आणि एचओडी आहेत)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)