Silver Rate Today : सकाळी कडाडले अन् संध्याकाळी गडगडले..एका दिवसात चांदीच्या दरात लाखाची घसरण, भविष्यात..

बुलढाणा जिल्ह्यातील'रजत नगरी'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरातील चांदी बाजारात आज ऐतिहासिक घसरण झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Silver Rate Today

अमोल सराफ, प्रतिनिधी

Silver Rate Latest Update : बुलढाणा जिल्ह्यातील'रजत नगरी'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरातील चांदी बाजारात आज ऐतिहासिक घसरण झाली. आज सकाळी चांदीची किंमत तब्बल 4 लाख 21 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली होती. पंरतु,आज संध्याकाळी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचे भाव आता 3 लाख 21 हजार रुपयांपर्यंत घसरले आहेत. एकाच दिवसात लाख रुपयांची घसरण झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चांदी खरेदीदारांना सावध राहण्याचा इशारा

ही आतापर्यंतची ऑल टाईम मोठी घसरण असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांचे मत आहे.बाजारात चांदीचे दर अचानक कोलमड्यामुळे व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. भविष्यात चांदीच्या दरात यापेक्षाही जास्त घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  चांदी विक्रेत्यांनी ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. चांदी खरेदी करण्यापूर्वी सतर्कता बाळगावी,असं आवाहनही करण्यात आलं आहे. 

नक्की वाचा >> Emotional Video: आई ती आईच असते..वासराची चोरी थांबवण्यासाठी गायीने गो तस्करांना घेरलं, शेवटी नको तेच घडलं

चांदीच्या दराबाबत व्यापारी काय म्हणाले?

स्थानिक व्यापारी आणि विश्वकर्मा सिल्वर हाऊस चे संचालक जांगिड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय, ,"चांदीच्या किंमतीत अशी प्रचंड घसरण कधीच पाहिली नाही.आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि मागणीतील घट यामुळे हे घडले.गुंतवणूकदारांनी आता घाईघाईत खरेदी टाळावी आणि बाजाराची वाट पाहावी."

नक्की वाचा >> CCTV Video : नाशिकमध्ये भीतीचं सावट, सोसायट्यांमधील लोक अलर्ट मोडवर, रात्री अचानक कुत्रे भुंकू लागले अन्..

दुसरे व्यापारी म्हणाले,"ग्राहकांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच चांदी घ्यावी.नाहीतर नुकसान होऊ शकते. या घसरणीमुळे रजत नगरीतील चांदी व्यापारावर परिणाम होतो. भविष्यातील ट्रेंडवर सर्वांची नजर आहे.ग्राहकांनी आता सावधगिरी बाळगावी.हाच व्यापाऱ्यांचा सल्ला आहे."

Advertisement