जाहिरात

CCTV Video : नाशिकमध्ये भीतीचं सावट, सोसायट्यांमधील लोक अलर्ट मोडवर, रात्री अचानक कुत्रे भुंकू लागले अन्..

नाशिकच्या सिडको परिसरातील अंबड भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सीसीटीव्ही व्हिडीओ..

CCTV Video : नाशिकमध्ये भीतीचं सावट, सोसायट्यांमधील लोक अलर्ट मोडवर, रात्री अचानक कुत्रे भुंकू लागले अन्..
Nashik Dangerous Video Viral

राहूल वाघ, प्रतिनिधी 

Nashik Shocking News Today : नाशिकच्या सिडको परिसरातील अंबड भागात तरस (हायना) हा वन्यप्राणी दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास अंबड येथील ‘कम्फर्ट झोन' सोसायटीच्या बाहेर या वन्यप्राण्याने मुक्त संचार केल्याची माहिती आहे. या तरसाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ज्यावेळी हा प्राणी या भागत फिरत होता, तेव्हा सोसायटीचे मुख्य गेट बंद होते. त्यामुळे सोसायटीत प्रवेश करू शकला नाही आणि संभाव्य अनर्थ टळला. 

अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला, पण..

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी सोसायटीतील सुरक्षारक्षकांना अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. लोकांना संशय आल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांना सोसायटीच्या गेटबाहेर तरस फिरत असल्याचं धक्कादायक दृष्य दिसलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या खतरनाक वन्यप्राण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. हा तरस लक्ष्मीनगरच्या दिशेने जात असल्याचं त्यांनी पाहिलं. काही वेळाने तो पुन्हा त्या परिसरात फिरत होता. तरस या ठिकाणी असलेल्या नाल्याच्या दिशेने निघून गेल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली. 

नक्की वाचा >> Pune News : 'गोल्ड मॅन'ला बिष्णोई गँगची धमकी, "बाबा सिद्धीकीसारखी अवस्था करू.." नेमकं प्रकरण काय?

जीवघेणा हल्ला करणारा प्राणी सीसीटीव्हीत कैद

या घटनेची माहिती तातडीनं सोसायटीच्या चेअरमन यांना देण्यात आली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून त्यांनाही या घटनेबाबत सांगण्यात आलं. या परिसरात नाले,मोकळी जागा आणि झाडी मोठ्या प्रमाणात असल्याने तरस त्या दिशेने गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान,या घटनेनंतर वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात खळबळ! विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलीस येताच 'त्या' 5 तरुणी..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com