- तमन्ना भाटिया आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी महागडे उत्पादनांऐवजी साध्या आणि अंतर्गत आरोग्य प्रक्रियेवर भर देते
- ती नियमितपणे त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लीनझिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या CTM रूटीनचे पालन करते
- तमन्नाच्या आहारात फळे, नट्स, हेल्दी फॅट्स आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. ती भरपूर पाणी पिते.
भारतीय चित्रपटसृष्टीतील 'मिल्की ब्युटी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा आहेत. वयाच्या 35 व्या वर्षीही तिची त्वचा 16 वर्षांच्या मुलीसारखी तजेलदार आणि चमकदार आहे. तमन्नाच्या 'काव्वला', 'आज की रात' यांसारख्या गाण्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळतात, ज्यात तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा होते. तमन्ना भाटियाच्या या नैसर्गिक सौंदर्यामागे कोणतेही महागडे उत्पादने नसून, एक अत्यंत साधे आणि अंतर्गत (Internal) आरोग्य प्रक्रिया आहे. ती आपल्या त्वचेची काळजी कशी घेते हेच आपण जाणून घेणार आहोत.
ती विशेष स्किन प्रोडक्ट्स वापरणे टाळते. ती निरोगी आहारावर (Healthy Diet) अधिक लक्ष केंद्रित करते. तमन्ना आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी 'केमिकल' (Chemical) युक्त उत्पादनांऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करते. ती नियमितपणे CTM (Cleansing, Toning, Moisturising) हे स्किन केअर रूटीन फॉलो करते. त्याच बरोबर ती काडी ट्रिक्स ही वापरते. त्यामुळे तिला तिच्या त्वचेची काळजी घेण्यास खूप मदत होते. त्यात काही गोष्टी पुढील प्रमाणे आहेत.
- Cleansing (क्लींझिंग): त्वचेची स्वच्छता.
- Toning (टोनिंग): त्वचेचा टोन संतुलित ठेवणे.
- Moisturising (मॉइश्चरायझिंग): त्वचेला आर्द्रता देणे.
याव्यतिरिक्त, तमन्नाच्या आहारात फळे (Fruits), नट्स (Nuts), हेल्दी फॅट्स (Healthy Fats) आणि हिरव्या भाज्या (Green Vegetables) यांचा समावेश असतो. ती घरगुती फेसपॅकसाठी हळद (Turmeric) आणि बेसनाचे (Besan) मिश्रण वापरते. शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) होणार नाही, याची ती विशेष काळजी घेते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, 'बाहुबली- द एपिक'मध्ये दिसलेली तमन्ना लवकरच 'माना शंकरा वरा प्रसाद गारु', 'ओ रोमियो', 'रेंजर' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.