चेहऱ्यावर ग्लो यावा, तो जास्त उजळलेला दिसावा यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. काही वेळा केमिकल जन्य पदार्थ ही वापरले जातात. काही जण क्रिमचा ही भडीमार करतात. त्यातून उद्देश एकच असतो. तो म्हणजे आपला चेहरा कशा पद्धतीने उजळेल. सुंदर, डागरहित आणि तजेलदार त्वचा असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रिम्स वापरूनही अनेकदा हवा तसा परिणाम दिसत नाही. अशा वेळी नैसर्गिक उपायांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी काही टिप्स आहेत. त्या फॉले केल्यास घरच्या घरी तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो आणता येईल.
घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवलेला 'बीटरूट सोप' (Beetroot Soap) त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. हा साबण बनवण्यासाठी 1 बीट, 1 चमचा बदाम तेल, 1 चमचा कोरफडीचा गर (Aloe Vera Gel), 1 चमचा मिल्क पावडर आणि 125 ग्रॅम सोप बेस (Soap Base) आवश्यक आहे. यात सर्वात आधी बीट धुऊन घ्यावा लागतो. त्यानंतर सोलून त्याचा रस गाळणीने किंवा पातळ कपड्याने काढून घ्यायचा असतो. बीटामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते.
ज्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात. त्यानंतर त्यात बदाम तेल मिसळावे. जे त्वचेला मऊ करते. त्याच बरोबर बारीक सुरकुत्या घालवते. कोरफडीचा गर त्वचेला थंड ठेवतो. त्याचा फायदा म्हणजे त्याच्यामुळे पिंपल्सचे डाग निघून जातात. मिल्क पावडर नैसर्गिक ब्लीचिंगचे काम करते. सोप बेसचे बारीक तुकडे करून डबल बॉयलिंग पद्धतीने (गरम पाण्यावर भांडे ठेवून) वितळवून घ्यावेत. त्यात हे सर्व मिश्रण एकत्र करून सोप मोल्डमध्ये (साच्यात) टाकावे. त्यानंतर 2 तास फ्रीजमध्ये ठेवावे. हा साबण रोज वापरल्यास काही दिवसांतच त्वचेवर फरक दिसून येतो असं तज्ज्ञांचं मत आहे.
रात्री आणि सकाळी त्वचेची काळजी कशी घ्यावी? हे ही आपण जाणून घेणार आहोत. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचा गर किंवा मॉइश्चरायझर लावावे. यामुळे दिवसभराचा थकवा आणि धूळ निघून जाऊन सकाळी त्वचा ताजी तजेलदार दिसते. तर सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थंड पाण्याचे हपके मारावेत. माईल्ड क्लिंजरने चेहरा धुऊन मॉइश्चरायझर लावावे. यामुळे रात्रभर जमा झालेले तेल स्वच्छ होते.