Health Benefits: रात्री कपडे काढून झोपणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

कपड्यांशिवाय झोपण्याचे काही नुकसान (Side Effects) देखील आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या गोष्टी वाईट याबाबत NDTV मराठीच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती देण्यात येते. सर्व सामान्यांना पडणाऱ्या साध्यासाध्या प्रश्नांची उत्तर देण्याचा यातून प्रयत्न असतो. अनेक वाचक काही प्रश्न उपस्थित करत असतात. त्या पैकीच एक प्रश्न होता की रात्री कपडे काढून झोपणे (Sleeping Naked) आरोग्यासाठी फायद्याचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर या लेखातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्याच्या दगदगीच्या जीवनात झोपेकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्याचे परिणाम आपल्या शरिरावर आपल्याला पाहायला मिळतात.  

कपड्यांशिवाय झोपण्याचे 7 प्रमुख फायदे

कपड्यांशिवाय झोपण्याचे काही फायदे ही आहेत तशे काही तोटे ही आहेत. कपडे न घालता झोपल्याने शरीराला आराम मिळतो. शिवाय त्वचेला मोकळी हवा मिळते. ज्यामुळे अनेक शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. कपडे न घालता झोपल्या मुळे शरिराचं तापमान ही नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय चांगली झोप लागण्यासही मदत होते. त्यामुळे कपडने न घालण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते आहेत त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. 

नक्की वाचा - Aadhaar Card: लहान मुलांचे आधार कार्ड कसं बनवाल, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रीया

  • उत्तम झोप (Better Sleep): healthline.com नुसार, कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराला अधिक आराम मिळतो. झोपेची गुणवत्ता सुधारते. यामुळे त्वचा चांगली राहाते. शिवाय गाढ झोप लागते.
  • शरीराचे तापमान नियंत्रण (Temperature Control): कपड्यांशिवाय झोपल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. तापमान योग्य राहिल्यास झोपेचा दर्जा सुधारतो.
  • त्वचेचे आरोग्य (Skin Health): त्वचा मोकळी राहिल्याने तिला श्वास घेण्यास पुरेसा वाव मिळतो. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.
  • मानसिक शांतता (Mental Peace): काही संशोधने दावा करतात की यामुळे मानसिक शांतता आणि आराम मिळतो. ज्यामुळे तणाव (Stress) कमी होतो.
  • हार्मोनल संतुलन (Hormonal Balance): www.sleepfoundation.org च्या अहवालानुसार, यामुळे हार्मोनल संतुलन सुधारते आणि शरीराची कार्यप्रणाली उत्तम चालते.
  • जनन क्षमतेत वाढ (Increased Fertility): संशोधनात आढळले आहे की, ढिले अंतर्वस्त्रे (undergarments) वापरणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या अधिक असते. कपड्यांशिवाय झोपल्याने अंडकोषांना थंड ठेवून शुक्राणूंच्या आरोग्यासाठी योग्य तापमान राखण्यास मदत होते. ज्यामुळे पुरुष जनन क्षमतेत वाढ होऊ शकते.
  • संसर्गाचा धोका कमी (Reduced Yeast Infection Risk): कपड्यांशिवाय झोपल्याने योनीमार्गाचे आरोग्य सुधारते आणि यीस्ट संसर्गाचा (Yeast Infection) धोका कमी होतो. उष्ण आणि दमट वातावरणात यीस्ट वाढते, मात्र कपड्यांशिवाय झोपल्याने हा भाग कोरडा आणि हवादार राहतो.

नुकसान आणि खबरदारी
कपड्यांशिवाय झोपण्याचे काही नुकसान (Side Effects) देखील आहेत. जसे की थंडी वाजणे किंवा ॲलर्जीची समस्या. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक पसंतीवर अवलंबून आहे. जर तुम्ही कपड्यांशिवाय झोपण्याचा विचार करत असाल, तर खोली स्वच्छ आणि सुरक्षित असल्याची खात्री करा आणि थंडीपासून वाचण्यासाठी हलकी चादर किंवा ब्लँकेट वापरू शकता.