तंबाखू आणि गांजामुळे तुमचा मेंदू म्हातारा होतोय, अभ्यासात भीतीदायक खुलासा

Smoking Effect On Brain: धूम्रपानाचा तुमच्या मेंदूवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
How Smoking Affects Your Brain Health

Smoking Effect On Brain: सिगारेट आणि गांजा ओढल्याने आपल्या फुप्फुसांचं नुकसान होतं आणि हृदयरोगाचा धोका वाढतो, हे आपण अनेकदा ऐकलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, धूम्रपानाचा तुमच्या मेंदूवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 'असोसिएशन ऑफ कॅनॅबिस' नावाच्या एका अभ्यासानुसार, सिगारेट आणि गांजाच्या सेवनामुळे मेंदू अकाली वृद्ध होत आहे.

Photo Credit: Pexels

किती जणांवर झालं संशोधन...

किंग्स कॉलेज लंडन आणि बाथ विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ७२,००० हून अधिक लोकांचा समावेश असलेल्या जवळपास १०० अभ्यासांचं परीक्षण केले. 

निकालानुसार, जे लोक सिगारेट आणि गांजा घेतात त्यांच्या मेंदूवर दुष्परिणाम होतो. 

मेंदूच्या कोणत्या भागावर होतो परिणाम?

संशोधनानुसार, धूम्रपानामुळे मेंदूचे अनेक महत्त्वाचे भाग कमजोर होतात.

भावना आणि भीती - अभ्यासानुसार, आहे की गांजा वापरणाऱ्यांची अमिग्डाला लहान असू शकते, ज्यामुळे केवळ भीती आणि चिंता वाढत नाही, तर कठीण परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घेणे देखील अवघड होते.

Advertisement

स्मरणशक्ती आणि शिकणं - तंबाखूच्या अतिसेवनामुळे हिप्पोकॅम्पस (hippocampus) आकुंचन पावू शकतो, ज्यामुळे गोष्टी विसरणं सोपं होतं आणि नवीन गोष्टी लक्षात ठेवणं कठीण जातं.

भूक, तहान आणि वेदना - इन्सुला हा शरीराच्या गरजा जाणणारा भाग आहे. नुकसान झाल्यानंतर, तुम्हाला भूक आणि तहानचे अचूक संकेत मिळत नाहीत. चिडचिड वाढू शकते आणि तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो.

विचार करण्याची क्षमता - ग्रे मॅटर हा मेंदूचा सर्वात महत्त्वाचा थर आहे. जो विचार करणे, समजून घेणे आणि निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे, जर तुम्ही जास्त धूम्रपान केलं, तर ते तुमच्या मेंदूला मंद करू शकते. लक्ष केंद्रित करणं कठीण ठरू शकतं आणि मानसिक थकवा वाढवू शकतं.

संशोधनात असंही आढळून आलं आहे की, जास्त सिगारेट ओढल्याने मेंदू आकुंचन पावण्याचा धोका वाढू शकतो आणि जर तुम्ही दीर्घकाळ धूम्रपान केले, तर स्मरणशक्तीवर सर्वात आधी परिणाम होऊ शकतो.

Advertisement