ऑगस्ट महिन्यात अवघ्या 16 दिवसांत 2 मोठी ग्रहणे; भारतात काय होणार परिणाम? जाणून घ्या तारीख, वेळ आणि सूतक काळ

Solar And Lunar Eclipse 2026: ऑगस्ट 2026 मध्ये केवळ 16 दिवसांच्या अंतराने सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अशी दोन मोठी ग्रहणे होणार आहेत. ही ग्रहणे कधी आणि कुठे दिसणार, राशींवर काय परिणाम होणार? आणि भारतात सूतक काळ पाळला जाणार की नाही? वाचा सविस्तर...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Solar And Lunar Eclipse 2026: सूर्य ग्रहणात सूतक काळ पाळला जाणार आहे का?"
Canva

Solar And Lunar Eclipse 2026: ऑगस्ट 2026 केवळ सणांमुळेच नाही तर आकाशात घडणाऱ्या दोन मोठ्या खगोलीय घटनांमुळेही खास असणार आहे. या महिन्यात अवघ्या 16 दिवसांच्या आत आधी सूर्यग्रहण आणि नंतर चंद्रग्रहण होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत त्यामुळे येथे वेध काळही मानला जाणार नाही. पण ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाला केवळ आकाशात दिसणारी खगोलीय घटना मानले जात नाही. ग्रहांची चाल आणि राशींवर होणाऱ्या त्याच्या परिणामाचीही यात चर्चा होते. अशा परिस्थितीत ही दोन्ही ग्रहणे कधी लागतील? कुठे दिसतील आणि त्यांचे महत्त्व काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांच्या मनात आहे.

ऑगस्टमध्ये दोन्ही ग्रहणे कधी लागतील? (When Will The Two Eclipses Happen In August)

ऑगस्ट 2026 मधील पहिले ग्रहण 12 ऑगस्टला सूर्यग्रहणाच्या रूपात लागेल. यानंतर 27 आणि 28 ऑगस्टच्या मध्यरात्री चंद्रग्रहण होईल. ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. त्यामुळे येथे वेध काळ मान्य नसेल. असे असले तरी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीमुळे या ग्रहणांना विशेष मानले जात आहे.

Advertisement

ग्रहण खास का मानले जाते? (Why Is Eclipse Considered Important)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला मान-सन्मान, आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक मानले जाते. तर चंद्र हा मन आणि भावनांशी जोडलेला मानला जातो. ग्रहणाच्या वेळी राहू आणि केतूची स्थिती देखील महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार याचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे काहींच्या आयुष्यात छोटे तर काहींच्या आयुष्यात मोठे बदल पाहायला मिळू शकतात, असे म्हणतात.

(नक्की वाचा: Vastu Tips For Money: सावधान! 90% लोक करतात या 5 मोठ्या चुका, म्हणून तुमच्या घरावर होत नाही लक्ष्मीमातेची कृपा)

दोन्ही ग्रहणे कोणत्या देशांमध्ये दिसतील? (Where Will The Eclipses Be Visible)

12 ऑगस्टचे पूर्ण (खग्रास) सूर्यग्रहण ग्रीनलँड, आइसलँड आणि उत्तर स्पेनच्या काही भागांमध्ये दिसेल. तसेच युरोप, उत्तर आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये आंशिक (खंडग्रास) सूर्यग्रहण पाहायला मिळेल. यानंतर 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्टचे चंद्रग्रहण उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागांसह युरोप आणि आफ्रिकेच्या अनेक देशांमध्ये दिसेल.

(नक्की वाचा: Ashadhi Ekadashi 2026 Date: आषाढी एकादशी कधी आहे 24 की 25 जुलै? जाणून घ्या योग्य तिथी आणि पूजेचा शुभ मुहूर्त)

Advertisement

ग्रहणाच्या वेळी काय करावे? (What To Do During Eclipse)

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाच्या वेळी देवाचे ध्यान करणे, मंत्रजप करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. तसेच राग करणे, विनाकारण वाद घालणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पण ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत, त्यामुळे येथे सूतक काळ पाळला जाणार नाही.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


Topics mentioned in this article