Home Remedies For Sore Throat: बदलत्या हवामानात अनेकदा काही लोकांचा आवाज बसतो (घसा बसतो), ज्यामुळे केवळ बोलतानाच नाही तर खाद्यपदार्थ गिळताना किंवा पाणी पितानाही खूप त्रास होतो. पण आता या लहानशा समस्येसाठी अँटी-बायोटिकचा (Antibiotic) आधार घेतला जावा, हेही योग्य नाही ना. म्हणूनच आम्ही तुम्हाला आचार्य बालकृष्ण यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला एक असा उपाय सांगणार आहोत, जो तुम्हाला घरी बसून या समस्येपासून मुक्तता मिळवून देऊ शकतो.
येथे पाहा पोस्ट...
(नक्की वाचा: Stomach Health: रिकाम्या पोटी 'या' 3 गोष्टी खाणं बंद करा, पोटाचं आरोग्य कायमचं बिघडेल! डॉक्टरांचा गंभीर इशारा)
बसलेला घसा कसा मोकळा करावा?
साहित्य:
- कोमट पाणी
- आल्याचा रस
- लिंबाचा रस
- मीठ
कसा करावा उपाय?
- सर्वात आधी तुम्हाला अर्धा कप कोमट पाणी घ्यायचे आहे.
- कोमट पाण्यात थोडा आल्याचा आणि लिंबाचा रस मिक्स करा.
- आता एक चिमूटभर मीठ टाकून पाणी चांगले ढवळून घ्या.
- त्यानंतर हे पाणी हळूहळू प्या.
(नक्की वाचा: Benefits Of Squeezing Lemon On Food: तुम्हालाही खाद्यपदार्थांवर लिंबू पिळून खाण्याची सवय आहे? शरीरावर काय होतो परिणाम? वाचा)
या घरगुती उपायामुळे काय फायदा होईल?
जर तुम्ही नियमितपणे हा उपाय केला तर या सर्व गोष्टींमधील गुणधर्मामुळ घशातील खवखव कमी होण्यासह वेदना आणि सूज यापासूनही आराम मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)