जाहिरात
This Article is From Feb 11, 2026

Strongest Liquor: ना व्हिस्की ना टकीला!'ही' आहे जगातील सर्वात स्ट्राँग दारू, पिण्यापूर्वी 10 वेळा विचार करा

आधी त्याची खात्री करानंतरच ते प्यायचे की नाही ते ठरवा. कारण ते अन्य दारूच्या तुलनेत फारच वेगळे आणि स्ट्राँग आहे.

Strongest Liquor: ना व्हिस्की ना टकीला!'ही' आहे जगातील सर्वात स्ट्राँग दारू, पिण्यापूर्वी 10 वेळा विचार करा

जगात मद्य प्रेमी कमी नाही. भारतात ही मोठ्या प्रमाणात दारुचे चाहते आहेत. त्यांना वेगवेगळी दारू घेणे आवडते. मग कुणी बिअरला पसंती देतं, तर कुणी व्हिस्की पितं. काहींना फेवरेच वोडका आणि टकीला ही असतो. तर काही जण देशीवर ही आपली हौस भागवतात. पण या सर्वांना टक्कर देणारी अशी एक दारू आहे जी जगात सर्वात स्ट्राँग समजली जाते. ती पिण्या आधी दहा वेळा विचार करा असा सल्ला हि दिला जातो. असं असलं तरी ती दारू पिणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. तीचा रंग ही अन्य दारू पेक्षा वेगळा आहे हे विशेष. त्याच दारू बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. 

मद्यप्रेमींमध्ये सहसा व्हिस्की किंवा टकीला हे सर्वात कडक मद्य मानले जाते. मात्र, वाईन तज्ज्ञ सोनल हॉलँड यांच्या मते, 'एब्सिन' (Absinthe) हे मद्य या सर्वांपेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आहे. या मद्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण तब्बल 60 ते 75 टक्क्यांच्या दरम्यान असते. जे सामान्य व्हिस्कीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळे एब्सिन हे मद्य जगात सर्वात स्ट्राँग मानले जाते. अनेक जण दारूचे शौकीन ही दारू पिणे पसंत करतात. त्याला विशिष्ठ वर्गाकडून मागणी ही मोठी आहे.  

नक्की वाचा - Oral Hygiene: रात्री झोपण्या पूर्वी दात का घासावेत? दिवसातून किती वेळा ब्रश करण्याचा तज्ज्ञ देतात सल्ला

विशेष म्हणजे एब्सिन या दारूची निर्मिती औषधी वनस्पतींपासून होते. एब्सिन हे दिसायला इतर मद्यांप्रमाणे ब्राऊन किंवा पारदर्शक नसून गडद हिरव्या रंगाचे असते. याची चव हर्बल आणि स्पाईसी असते. बडीशेप आणि नागदौना (Wormwood) यांसारख्या औषधी वनस्पतींपासून हे तयार केले जाते. यातील घटक अत्यंत तीव्र असल्याने त्याची नशा लवकर चढते. त्यामुळे ज्याला जास्त नशेची हौस आहे असेच मद्यपी एब्सिन दारू पिण्याला प्राधान्य देतात. 

नक्की वाचा - Period Pain: मासिक पाळीत पोट खूप दुखतंय? हे आहेत सोपे घरगुती उपाय, वेदनांपासून अशी मिळवा झटपट सुटका

'लाऊजिंग' हे मद्य इतके तीव्र असते की ते थेट पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सोनल हॉलँड सांगतात की, हे पिण्यापूर्वी त्यात पाणी किंवा शुगर क्यूब (साखरेचा खडा) टाकला जातो. या प्रक्रियेला 'लाऊजिंग' (Louching) असे म्हणतात. यामुळे मद्याची तीव्रता थोडी कमी होते. त्यामुळे जर कोणी तुम्हाला हे 'ग्रीन ड्रिंक' ऑफर केले, तर सावध राहणेच हिताचे ठरेल. आधी त्याची खात्री करानंतरच ते प्यायचे की नाही ते ठरवा. कारण ते अन्य दारूच्या तुलनेत फारच वेगळे आणि स्ट्राँग आहे. 

वैशिष्ट्ये आणि बनावट

  • रंग: हे मद्य हिरव्या रंगाचे असते.
  • घटक: बडीशेप आणि नागदौना या वनस्पतींचा वापर.
  • चव: हर्बल आणि तिखट चव.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com