​Health News: महिनाभर चहा बंद केला तर काय होईल? कॉर्पोरेट तरुणीच्या 30 दिवसांच्या चॅलेंजची गोष्ट

येथूनच तिच्या '30 दिवस चहामुक्ती'च्या आव्हानाला सुरुवात झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पल्लवीने दिवसातून चार ते पाच कप चहा पिण्याची सवय सोडून ३० दिवस चहा न पिण्याचा प्रयोग केला
  • चहा सोडल्यामुळे सुरुवातीला डोकेदुखी आणि थकवा जाणवला तरी पुढे शरीरात सकारात्मक बदल दिसू लागले
  • चहा न पिण्याने तिचा ऍसिडिटी आणि ब्लोटिंगचा त्रास ९० टक्के कमी झाला तसेच पचनक्रिया सुधारली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

​कॉर्पोरेट जगतात धावपळ ही नित्याचीच झाली आहे. जणू ती एक जीवनशैली बनली आहे. त्यात चहाचे व्यसन हे आजच्या तरुणाईचे समीकरण बनले आहे. दिल्लीत राहणाऱ्या 27 वर्षीय पल्लवीने या सवयीला फाटा देत एक अनोखा प्रयोग केला. नोएडा येथील एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी पल्लवी दिवसातून 4 ते 5 कप चहा प्यायची. मात्र, उन्हाळा वाढल्याने तिने बाहेर जाणे टाळले. येथूनच तिच्या '30 दिवस चहामुक्ती'च्या आव्हानाला सुरुवात झाली. या एका महिन्याच्या प्रयोगाने तिचे आरोग्य तर सुधारलेच, पण आर्थिक बचतही झाली.

​पल्लवीच्या मते, आव्हानाचे पहिले 3 ते 4 दिवस अत्यंत कठीण होते. चहाची सवय झाली होती. त्याची एक वेगळी नशा असते. चहा नसेल तर अस्वस्थ व्हायला होतं. सहकाऱ्यांसोबत चहाची सुट्टी टाळणे मानसिक युद्धासारखे होते असं ती आवर्जून सांगते. शरीराला कॅफिनची सवय असल्याने सुरुवातीला डोकेदुखीचा झाला. पण त्यावर काही प्रमाणात मात केली. शिवाय थकवा ही जाणव होता. मात्र, 5 व्या दिवसापासून शरीरात सकारात्मक बदल दिसू लागले. ते आपल्यासाठी फायद्याचे ठरले असं ही ती सांगते. 

Advertisement

नक्की वाचा - Weight Loss: भन्नाट देसी डाएट! एका झटक्यात तरुणीने घटवले 26 किलो वजन, वाचा तिचा 'देसी' डाएट प्लॅन

​चहा सोडल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत पल्लवीचा ऍसिडिटी आणि ब्लोटिंगचा त्रास 90% कमी झाला. पचनक्रिया सुधारल्यामुळे तिला उत्साही वाटू लागले. तसेच तिची झोप आणि त्वचेमध्येही लक्षणीय सुधारणा झाली. सकाळी लवकर उठल्यामुळे तिला स्वतःसाठी वेळ मिळू लागला, ज्यामुळे कामावरील लक्ष केंद्रित झाले. त्यामुळे चहा सोडल्याचेच फायदे तिला झाले. काही दिवस त्रास झाला. पण पुढचे काही दिवस हे आरोग्यासाठी चांगले ठरले. चहा घेण्याचा आणि चहा न घेण्याचा फरक ही तिला जाणवला. 

नक्की वाचा - Extra Marital Affair: विवाहबाह्य संबंधासाठी 'हे' शहर नंबर वन! मुंबई, पुणे, दिल्लीचा कितवा क्रमांक? पाहा यादी

​महिन्याच्या शेवटी तिने युपीआय (UPI) स्टेटमेंट तपासले. त्यात पल्लवीला धक्काच बसवा. पल्लवी ते स्टेटमेंट पाहून थक्क झाली. दिवसाला 3 ते 4 चहा, सोबतीला स्नॅक्स आणि मित्रांचे बिल मिळून दरमहा 3000 ते 4000 रुपयांचा तिचा खर्च होत होता. जो आता थेट शून्य झाला होता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार, बाहेरच्या चहामध्ये अतिरिक्त साखर आणि फॅट असते. तो सोडल्यास वजन नियंत्रित राहते आणि शरीर डिटॉक्स होते. तोच अनुभव पल्लवीला आला.