जाहिरात

Weight Loss: भन्नाट देसी डाएट! एका झटक्यात तरुणीने घटवले 26 किलो वजन, वाचा तिचा 'देसी' डाएट प्लॅन

शिवाय तिने ही याच जोरावर जवळपास 26 किलो वजन कमी केले आहे.

Weight Loss: भन्नाट देसी डाएट! एका झटक्यात तरुणीने घटवले  26 किलो वजन, वाचा तिचा 'देसी' डाएट प्लॅन
  • फिटनेस कंटेंट क्रिएटर रितमने महागड्या डाएटशिवाय साध्या जेवणातून नियमित व्यायामाने 26 किलो वजन कमी केले आहे
  • रितम दिवसाची सुरुवात प्रोटीनयुक्त नाश्त्याने करते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि खाण्याची इच्छा कमी होते
  • दोन वर्षे सलग तिने दुपारच्या जेवणात चिकन, भात आणि भाज्यांचा समावेश करणारा संतुलित आहार घेतला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

वजन कमी करायचे म्हटले की, अनेकदा वेगवेगळे पद्धतीची डाएट केली जातात. चपाती, भात आणि आवडीच्या पदार्थांचा सर्रास त्याग केला जातो. किंवा तसा सल्ला दिला जातो. सध्या सोशल मीडियावर महागडे सॅलड, परदेशी खाद्यपदार्थ आणि कठीण नियमांचे डाएट ट्रेंड्स पाहायला मिळतात. मात्र, फिटनेस कंटेंट क्रिएटर रितम हिने या सर्व गोष्टींना छेद दिला आहे. कोणत्याही महागड्या डाएटशिवाय, रोजच्या साध्या जेवणातून आणि नियमित व्यायामाच्या जोरावर तिने तब्बल 26 किलो वजन कमी केले आहे.

​रितमच्या मते, तिच्या दिवसाची सुरुवात नेहमी प्रोटीनयुक्त नाश्त्याने होते. ती दररोज सकाळी प्रोटीन बाऊल खाते, ज्यामुळे शरीराला पुर पोषक तत्वे मिळतात. सकाळी प्रोटीन घेतल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. चमचमीत खाण्याची इच्छा होत नाही. ​दुपारच्या जेवणात रितम दररोज चिकन, भात आणि भाज्यांचा समावेश करत होती. विशेष म्हणजे, सलग 2 वर्षे तिने याच जेवणाचा अवलंब केला. दररोज नवीन काय खायचे याचा विचार करण्यापेक्षा, एकाच संतुलित आहार घेणे, अधिक सोपे आणि प्रभावी असल्याचं ती सांगते.

नक्की वाचा - Video: 'एकीकडे अश्लील पूल पार्टी, दुसरीकडे पाण्याची वणवण'! भाजप आमदाराची शिवसेनेच्या मंत्र्याकडून पोलखोल?

अनेक जण वजन कमी करताना कार्बोहायड्रेट्स आणि चपाती पूर्णपणे बंद करतात. पण रितमने रात्रीच्या जेवणात चिकन खिमा, चपाती आणि सॅलड खाऊन 26 किलो वजन घटवले आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं असल्याचं ती सांगते. वजन कमी करण्यासाठी देसी जेवण सोडण्याची गरज नाही, हे तिने सिद्ध केल्याचा तिचाच दावा आहे. ​रितम रोज रात्री डार्क चॉकलेटचा एक तुकडा देखील खायची. 

नक्की वाच - Pavanraje Nimbalkar: सर्व जण निर्दोष मग, पवनराजेंचा खून कुणी केला? राणा जगजितसिंह पाटलांनी थेट सांगितले

डाएट करताना मानसिक त्रास होऊ नये, म्हणून आवडीच्या गोष्टी मर्यादेत खाणे गरजेचे असते. असं तिही मानते. तिने सलग 2 वर्षे हाच आहार आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग फॉलो केले. वजन कमी करण्यासाठी महागड्या डाएटची नाही, तर संयम आणि सातत्याची गरज असते, असा सल्ला तिने दिला आहे. शिवाय तिने ही याच जोरावर जवळपास 26 किलो वजन  कमी केले आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com