Health Tips: उन्हाळ्यात भरपूर पाणी पिऊनही तहान भागत नाही? 'हे' आहे छुपे कारण

उन्हाळ्यात फक्त पाणी पिणे पुरेसे नसते. आपल्या शरीराला पाण्यासोबतच मीठ आणि साखरेचे म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखणे गरजेचे असते.

जाहिरात
Read Time: 2 mins

उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे शरीराची लाहीलाही होत असताना आपण पाणी जास्त पितो. परंतु, अनेकदा भरपूर पाणी पिऊनही तहान न भागल्याची तक्रार अनेकांकडून केली जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे केवळ डिहायड्रेशन नसून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सच्या संतुलनाचा बिघाड असू शकतो. घामावाटे शरीरातील क्षारांचे उत्सर्जन झाल्यामुळे साधे पाणी शरीरात टिकून राहत नाही. अशा वेळी लिंबू सरबत किंवा नैसर्गिक पेयांचा आधार घेणे आवश्यक ठरते. तसेच फ्रिजमधील अति थंड पाण्यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊन तहान लागण्याची प्रक्रिया अधिक क्लिष्ट होते.
 
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण भरपूर पाणी पितो. मात्र, अनेकदा सतत पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर त्यामागे केवळ पाण्याची कमतरता नाही, तर काही वेगळी कारणे असू शकतात. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातून केवळ पाणीच बाहेर पडत नाही, तर सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी महत्त्वाची खनिजेही निघून जातात. यालाच 'इलेक्ट्रोलाइट्स' म्हणतात. 

नक्की वाचा - Summer Cooling: भयंकर उष्णतेपासून बेडरूम कसा ठेवाल थंड? AC सोडा हे 4 प्लांट्स लावा अन् रूम करा थंड

Advertisement

जेव्हा तुम्ही फक्त साधे पाणी पिता, तेव्हा शरीर ते साठवून ठेवण्याऐवजी फिल्टर करून बाहेर टाकते. त्यामुळे शरीराला आवश्यक खनिजे न मिळाल्याने मेंदू पुन्हा तहानेचा सिग्नल देतो. उन्हाळ्यात फ्रिजमधील थंडगार पाणी पिणे सुखद वाटते, पण ते तहान भागवण्यासाठी पुरेसे नसते. अति थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे शरीर पाणी व्यवस्थित शोषून घेऊ शकत नाही. परिणामी, तहान लवकर भागत नाही.

नक्की वाचा - बालकनीतील कबुतरांच्या त्रासाने हैराण आहात? या 'स्मार्ट' ट्रिक्स वापरून त्यांना लावा कायमचे पळवून

जर तुम्ही आहारात जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ घेत असाल, तर ते पचवण्यासाठी शरीराला अधिक पाण्याची गरज लागते. मिठाचे अतिप्रमाण शरीरातील पेशींमधून पाणी खेचून घेते, ज्यामुळे सतत पाणी प्यावेसे वाटते. तहान शमवण्यासाठी केवळ साधे पाणी पिण्याऐवजी त्यात लिंबू, थोडे काळे मीठ किंवा ओआरएस (ORS) मिसळून प्यावे. नारळ पाणी हा इलेक्ट्रोलाइट्सचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. तसेच, माठातील पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.


Topics mentioned in this article