How To Reduce Roof Heat Naturally: उन्हाळा सुरू झाला की सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे आपल्या घराचे तापणारे छत. दुपारच्या वेळी छत एखाद्या भट्टीसारखे तापू लागते. जर तुम्ही घराच्या वरच्या मजल्यावर (Top Floor) राहत असाल, तर दिवसा खोलीत बसणे एखाद्या शिक्षेसारखे वाटते. पंखा गरम हवा फेकू लागतो आणि कुलर-ACमुळेही फारसा फरक जाणवत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की काही सोप्या आणि स्वस्त उपाय करूनही तुम्ही तुमच्या घराचे छत थंड ठेवू शकता? चला तर मग जाणून घेऊया असे काही घरगुती टिप्स, ज्यामुळे छत थंड राहील आणि घरातही गारवा टिकून राहील.
कडक उन्हात जेव्हा छत तापू लागते, तेव्हा पूर्ण घर भट्टीसारखे जाणवू लागते. AC वापरणे प्रत्येकालाच परवडणारे नसते, पण काही स्वस्त उपाय करून तुम्ही तुमच्या घराचे छत थंड ठेवू शकता आणि घराचे तापमान काही अंशांनी कमी करू शकता.
AC नसतानाही घर राहील थंड, फक्त करा हे 4 सोपे उपाय
घराचे छत थंड ठेवण्यासाठी जाणून घेऊया स्वस्त आणि मस्त उपाय (Follow these steps to cool your roof)
1. ग्रीन नेट (Green Net)
तुम्ही नर्सरी किंवा बागेत हिरवी जाळी (Green Net) पाहिली असेल. ही जाळी तुम्ही तुमच्या घराच्या छतावर लावू शकता. ही जाळी सूर्याची थेट किरणे छतावर पडण्यापासून रोखते. यामुळे छताचा पृष्ठभाग तापत नाही आणि खालच्या खोलीत उन्हाची झळ कमी जाणवते.
(नक्की वाचा: When To Replace Matka: मडके कधी बदलावे, मडक्याची एक्सपायरी डेट कशी ओळखावी? जुन्या मडक्यामुळे काय परिणाम होतील?)
2. टेरेस गार्डन (Terrace Garden)
जर तुम्हाला झाडांची आवड असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. छतावर कुंड्या ठेवा. माती आणि झाडांमुळे छतावर उन्हाचा थेट परिणाम कमी होईल. जेव्हा तुम्ही झाडांना पाणी घालता, तेव्हा बाष्पीभवनामुळे (Evaporation) छत आपोआप थंड होते.
3. जाड गोणी (Gunny Bags)
हा एक अतिशय स्वस्त जुगाड आहे. संध्याकाळच्या वेळी छतावर जाड गोण्या पसरवा आणि त्यावर थोडे पाणी शिंपडा. यामुळे छतावरील उष्णता कमी होईल आणि रात्री खोली थंड होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: IMD Colour Code Alert Meaning: IMDकडून देण्यात येणाऱ्या Red, Orange, Yellow Alertचा अर्थ काय? जाणून घ्या)
4. पाणी शिंपडावे
छताची उष्णता कमी करण्यासाठी सूर्य मावळल्यानंतर छतावर पाणी मारा. दुपारी छतावर पाणी टाकू नका, कारण यामुळे आर्द्रता (Humidity/उकाडा) वाढू शकते.
Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)