Thar Safety Rating: 6 मित्रांचा अंत! तरुणांची फेव्हरेट Thar चं सेफ्टी रेटींग किती? तुम्हालाही बसेल धक्का

Mahindra Thar 2025 Safety Rating: अपघातानंतर थार गाडीच्या सुरक्षेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली थार गाडी नेमकी किती सुरक्षित आहे? वाचा....

जाहिरात
Read Time: 3 mins

Tamhini Ghat Accident Thar 2025 Safety Rating: ताम्हिणी घाटामध्ये झालेल्या थार गाडीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या दुर्घटनेत कोकणात फिरायला निघालेल्या सहा मित्रांचा कार दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला. ताम्हिणी घाटातील एका वळणावर अंदाज चुकला अन् नवी कोरी थार घेऊन फिरायला निघालेल्या या सहा तरुणांचा प्रवास कायमचा थांबला. या अपघातानंतर थार गाडीच्या सुरक्षेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली थार गाडी नेमकी किती सुरक्षित आहे? काय आहे त्याची सेफ्टी रेटिंग? जाणून घ्या..... 

थार गाडी किती सुरक्षित? 

थार गाड्यांच्या सिरीजपैकी थार रॉक ही सुरक्षित गाडी समजली जाते. क्रॅश चाचण्यांमध्ये भारत NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी महिंद्रा थार रॉक ही पहिली बॉडी-ऑन-फ्रेम SUV ठरली आहे. अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन  (AOP) म्हणजे वयस्कर प्रवासी संरक्षणमध्ये थार रॉकने 32 पैकी 31.09 गुण मिळवले. तसेच चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन  (COP)  मध्ये 49 पैकी 45 गुण मिळवले.

सामान्य  SUV साठी 5-स्टार रेटिंग मिळवणे ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. कोणत्याही ICE वाहनासाठी हा सर्वोत्तम स्कोअर असल्याचा महिंद्रा दावा करतो. दुसरीकडे, थ्री -डोअर कारचं ग्लोबल एनसीएपी रेटिंग अजूनही 4 स्टारच आहे. नोव्हेंबर 2020 च्या टेस्टनुसार हे रेटिंग देण्यात आलं असून त्यानंतर या कारवर नवीन टेस्ट झालेली नाही. 

Tamhini Ghat Accident: कष्टाचे साम्राज्य.. घर, थार अन् घाटात घात! रायगड अपघाताची काळीज पिळवटणारी INSIDE स्टोरी

या महिंद्रा वाहनांना 5-स्टार रेटिंग:

Advertisement

महिंद्रा ने भारत NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये इतर अनेक वाहने सादर केली, जिथे XUV 3XO आणि XUV400 ला देखील 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. महिंद्रा XUV 3XO ला प्रौढ प्रवासी संरक्षणात 32 पैकी 29.36 आणि बाल प्रवासी संरक्षणात 49 पैकी 43 गुण मिळाले. XUV400 ने प्रौढांसाठीच्या सुरक्षेमध्ये 32 पैकी 30,377 आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये 49 पैकी 43 गुण मिळवले.

थार गाडी घेताना कोणती काळजी घ्यावी? 

मॉडेल आणि ट्रिम निवडा: थार दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे - LX आणि AX. LX मॉडेलमध्ये मूलभूत वैशिष्ट्ये आहेत, तर AX मॉडेलमध्ये अधिक प्रगत वैशिष्ट्ये आहेत. शिवाय, थार तीन ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे - LX, LX (O) आणि AX. LX (O) ट्रिममध्ये LX मॉडेलपेक्षा अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत, तर AX ट्रिममध्ये सर्वात प्रगत वैशिष्ट्ये आहेत.

Advertisement

इंजिन पर्याय निवडा: थार दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे: 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 2.2-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन. पेट्रोल इंजिन 140 bhp आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते, तर डिझेल इंजिन 130 bhp आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते.

ट्रान्समिशन पर्याय निवडा: थारमध्ये दोन ट्रान्समिशन पर्याय आहेत: ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. मॅन्युअल ट्रान्समिशन अधिक नियंत्रण देते, तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अधिक आरामदायी आहे.

Advertisement

सस्पेंशन पर्याय निवडा: थारमध्ये दोन सस्पेंशन पर्याय आहेत: स्टील स्प्रिंग्जसह मॅग्नेशियम अलॉय व्हील्स आणि फ्रंट आणि रीअर डबल-स्पिन व्हील्स. स्टील स्प्रिंग्ज अधिक ऑफ-रोड क्षमता देतात, तर मॅग्नेशियम अलॉय व्हील्स अधिक ऑन-रोड क्षमता देतात.

एक वैशिष्ट्य निवडा: थारमध्ये पॉवर विंडो, पॉवर लॉक, एअर कंडिशनिंग, मल्टी-मीडिया सिस्टम, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि रिअल-टाइम ४x४ ट्रॅकिंग सिस्टम यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही तुमच्या गरजा आणि बजेटनुसार वैशिष्ट्ये निवडू शकता.

सॉफ्ट टॉप किंवा हार्ड टॉप निवडा: थारमध्ये दोन टॉप पर्याय आहेत: सॉफ्ट टॉप आणि हार्ड टॉप. सॉफ्ट टॉप अधिक परवडणारा आणि काढणे सोपे आहे, तर हार्ड टॉप अधिक टिकाऊ आणि सुरक्षित आहे.