Technical Guruji Weight Loss : जर तुम्हाला नवनव्या टेक्नॉलॉजीबद्दल जाणून घेण्याची आवड असेल तर तुम्ही टेक्निकल गुरू गौरव चौधरी याला निश्चित ओळखत असाल. आपल्या टेक व्हिडिओच्या माध्यमातून कोट्यवधि लोकांच्या मनावर राज्य करणारे गौरव सध्या त्यांच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी अवघ्या चार महिन्यात ३० किलो वजन कमी केलंय. ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गौरव चौधरी यांनी कोणत्या फॉर्म्युल्याचा वापर करीत ३० किलो वजन कमी केलं? या लेखात आम्ही तुम्हाला त्यांच्या वेट लॉस जर्नीबद्दल सांगणार आहोत. जो फॉर्म्युला फॉलो करीत तुम्हीही वजन कमी करू शकता.
१०५ किलोपर्यंत पोहोचलं होतं वजन...
अजमेरमध्ये राहणारे आणि दुबईत वास्तव्यास असलेले गौरव यांनी सांगितलं की, २०१५ पर्यंत ते संतुलित आयुष्य जगत होते. घरातलं अन्न आणि नियमित व्यायामामुळे ते फिट होते. मात्र हळूहळू कामाचा ताण वाढत गेला आणि लाइफस्टाइलही बदलली. सततचा प्रवास, अपुरी झोप, बाहेरील खाद्यपदार्थ याचा परिणाम शरीरावर दिसत होतं. २०२० पर्यंत त्यांचं वजन १०५ किलोच्या पार गेलं.
लॉकडाऊनमध्ये पायी चालण्याचा फायदा...
गौरव यांनी सांगितल्यानुसार, कोविडदरम्यान मला स्वत:वर काम करण्यासाठी वेळ मिळाला. चार महिन्यात मी साधारण ३० किलो वजन मी केलं. त्यादरम्यान मी दररोज २०-२० किलोमीटर पायी चालत होतो. दिवसातील ३ तास वॉकला देत होतो. मात्र कोविडनंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. २०२४ पर्यंत पुन्हा त्याचं वजन १०३ किलोपर्यंत पोहोचलं.
२०२५ मध्ये पुन्हा व्यायामाला सुरुवात...
मात्र गौरव खचला नाही. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याने वजन कमी करण्याचा निश्चय केला. मात्र यासाठी प्रवासाचं किंवा कामाचं कारण न देण्याचं ठरवलं. तो कडक डाएट आणि व्यायाम करू लागला. डिसेंबर २०२५ पर्यंत त्याचं वजन ७५ किलोपर्यंत कमी झालं. गौरव सांगतो, त्याचं शरीर पिळदार झालं आहे. त्याचं आरोग्यही खूप चांगलं झालं आहे.
फिटनेससाठी ५ सर्वात महत्त्वाच्या गोष्टी...
संयम ठेवा...
वजन एका रात्रीत वाढत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी संयम आवश्यक आहे.
पायी चालणं सर्वात चांगलं..
जिमला जाऊ शकत नसाल तर चांगलं आणि धावणं सर्वात चांगलं.
कारणं देऊ नका...
काम किंवा प्रवासाचं कारण देऊन व्यायाम टाळू नका.
सातत्य सर्वात मोठं आव्हान...
वजन कमी झाल्यानंतर ते टिकवणं सर्वात मोठं आव्हान आहे.
शिस्त हेचं सिक्रेट...
गौरव याने दिलेल्या माहितीनुसार, शॉर्टकट किंवा एआयच्या भरवशावर राहू नका. दररोजची छोटी छोटी ध्येयं मोठा बदल घडवून आणतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)