History of Dozen: आपण दैनंदिन जीवनात 'डझन' हा शब्द अनेकदा वापरतो, जसे की एक डझन अंडी किंवा एक डझन केळी. पण तुम्हाला माहीत आहे का, एका डझनमध्ये 12 हाच आकडा का ठरला? यामागे एक मनोरंजक आणि प्राचीन इतिहास दडलेला आहे, जो सुमारे 5000 वर्षांपूर्वी मेसोपोटेमियन संस्कृतीत सुरू झाला. त्यांच्या मोजमाप पद्धतीमुळेच 12 हा आकडा मोजण्यासाठी प्रमाण म्हणून स्वीकारला गेला.
असं म्हटलं जातं की, एका डझनमध्ये 12 वस्तू मोजण्याची प्रथा सुमेरियन आणि बॅबिलोनियन संस्कृतीने सुरू केली होती. त्यांनी ‘बेस-12' किंवा ‘डुओडेसिमल' ही मोजमाप पद्धत वापरली. या पद्धतीनुसार, ते आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्याने मोजमाप करत असत. आपल्या अंगठ्याने हाताच्या इतर चार बोटांवरील पेरे मोजता येतात. प्रत्येक बोटामध्ये 3 पेरे असल्याने, 4 बोटांच्या एकूण 12 पेऱ्यांना मोजण्यासाठी अंगठ्याचा वापर केला जात होता. आजही अनेक ठिकाणी अशी पद्धत वापरली जाते.
(नक्की वाचा- Gemini Photo prompts For Couples: प्री वेडिंग विसरा! 'हे' 15 प्रॉम्प्ट घ्या अन् बनवा सुंदर कपल फोटो)
12 आकडा का निवडला गेला?
12 हा आकडा गणितीयदृष्ट्या अनेक प्रकारे उपयुक्त आहे. तो 1, 2, 3, 4 आणि 6 या पाच लहान संख्यांनी सहज भागला जातो. या तुलनेत 10 हा आकडा फक्त 1, 2 आणि 5 ने भागला जातो. यामुळे 12 हा आकडा व्यापार आणि दैनंदिन व्यवहारांसाठी अधिक सोयीचा ठरला. प्राचीन काळातील व्यापारी वस्तूंना 2, 3, 4 किंवा 6 च्या गटांमध्ये सहजपणे विभागू शकत होते, ज्यामुळे मोजमाप सोपे झाले.
कालांतराने, ‘डझन' ही संकल्पना विविध संस्कृती आणि भाषांमध्ये पसरली. फ्रेंच भाषेत डौझेन (Douzaine) या शब्दावरून डझन हा शब्द इंग्रजीत आला. हा शब्द जुन्या फ्रेंच शब्द दौज (douze) म्हणजे 12 या शब्दापासून तयार झाला आहे.
(नक्की वाचा- Gemini AI Photos Trend Safety: क्षणाचा आनंद, आयुष्यभर मनस्ताप! जेमिनी ट्रेंड वापरताना काय काळजी घ्यावी?)
‘डझन'चा वापर कसा वाढला?
प्राचीन मेसोपोटेमियन पद्धतीनंतर, इजिप्शियन लोकांनीही 12 चा वापर मोजमापासाठी केला. त्यांनी दिवस-रात्र प्रत्येकी 12 तासांमध्ये विभागले. त्यानंतर, रोमनांनीही 12 चा वापर केला आणि तो युरोपमध्ये अधिक लोकप्रिय झाला. आजही 12 हा आकडा अनेक ठिकाणी प्रमाण म्हणून वापरला जातो. घड्याळात 12 तास असतात, कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात, आणि आपण एका डझनमध्ये 12 वस्तू मोजतो.