Electricity Save Tips : आपण वापरत नसलो तरीही घरातील 'ही' उपकरणं वीज वापरतात; बिल कमी येण्यासाठी 3 सवयी बदला!

Electricity Save Tips: प्रत्यक्षात आपल्या घरात असे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत, ज्याचा वापर न करतानाही ते वीज वापरत असतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
Electricity Save Tips
AI Photo

Electricity Save Tips : विजेचं वाढतं बिल पाहून सध्या सर्वांनाच धक्का बसत आहे. त्यात उन्हाळा जास्त असल्याने एसी-पंख्याचा वापर वाढल्याने बिलाचे आकडेही वाढत आहेत. मात्र प्रत्यक्षात आपल्या घरात असे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहेत, ज्याचा वापर न करतानाही ते वीज वापरत असतात. याच लहान लहान गोष्टीत केलेलं दुर्लक्ष मोठ्या रकमेत बदलतं आणि तुमचा खिसा अधिक कापला जातो.

टीव्ही, कम्प्युटर, चार्जरसारखी उपकरणं स्टँडबाय मोडमध्येही वीज घेत असतात. ज्याला वॅम्पायर लोड म्हणतात. याचा वापर करत नसतानाही विजेच्या बिलावर परिणाम होतो. त्यामुळे अशा उपकरणांना रिमोटऐवजी मेन स्विच बंद करणे आणि अनप्लग करण्याची सवय करायला हवी. 

Advertisement

UPPCL म्हणजे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.

नक्की वाचा - Summer Food : मे महिन्यात चुकूनही 'या' 3 भाज्या खाऊ नका; उन्हाळ्यात कोणत्या भाज्या टाळाल, काय खायला हवं?

मेन स्विच बंद करा - रिमोटने टीव्ही आणि सेट-टॉप बॉक्स किंवा कम्युटर बंद केल्यानंतरही त्याचा मेन स्विच बंद करावा. ही उपकरणामुळे जास्त वीज खर्च होते.

अनप्लग करा - अनेकदा लोक मोबाइल चार्ज झाल्यानंतरही चार्जर बोर्डला लावून ठेवतात. सोबतच प्लग ऑन करून ठेवात. ज्याचा विजेवर परिणाम होतो. अशात वापर न झाल्याने मोबाइल चार्जर, लॅपटॉप अडॅप्टर आणि मायक्रोव्हेवची वायर प्लगच्या बाहेर काढावी.

पॉवर स्ट्रिप्सचा प्रयोग - एकाचवेळी अनेक उपकरणं पूर्णपणे बंद करण्यासाठी ऑन-ऑफ स्विच असलेल्या पॉवर स्ट्रिप्सचा उपयोग करावा.

Topics mentioned in this article