Survey Report: भारतात सर्वाधिक कंडोमची विक्री कोणत्या राज्यात? महाराष्ट्राचा नंबर कितवा?

2024 ते 2035 या काळात आशियाई कंडोम बाजारपेठ 3% वार्षिक दराने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा अहवाल समोर आला आहे. या सर्वेमध्ये  भारतात कुटुंब नियोजनाबाबत आणि सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जनजागृती वाढत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणाच्या (NFHS 2021-22) आकडेवारीनुसार  भारतात कुणत्या राज्यात सर्वाधिका कंडोमची विक्री केली जाते याची आकडेवारी समरो आली आहे. शिवाय सर्वात कमी कंडोम विक्री कोणत्या राज्यात होते ही हे समोर आले आहे. यात महाराष्ट्राच क्रमांक कितवा याचा याचा ही उल्लेख या सर्वे मध्ये करण्यात आला आहे. 

या सर्वेनुसार दादरा नगर हवेलीत सर्वाधिक कंडोम विक्री होते. प्रमाण सर्वेक्षणानुसार, दादरा आणि नगर हवेलीमध्ये दर 10,000 जोडप्यांमागे 993 जोडपी कंडोमचा वापर करतात. तर आंध्र प्रदेशमध्ये हेच प्रमाण 10,000 मागे 978 इतके आहे. महानगरांमध्ये याची मागणी सर्वाधिक असली तरी, आता ग्रामीण भागातही कंडोम वापराचे प्रमाण वेगाने वाढत  आहेत.या सर्व गोष्टी  अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात दरवर्षी सरासरी 33.07 कोटी कंडोमची विक्री होते. महाराष्ट्रातही कंडोम वापराबाबत जागृत असल्याचं दिसून येत आहे.  

नक्की वाचा - Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी 'लवंगाचे पाणी' पिण्याचे फायदे माहीत आहेत का? 'या' आजारांपासून मिळेल सुटका

आशियात चीननंतर भारत कंडोम विक्रीत दुसऱ्या स्थानी आहे.  आशिया खंडाचा विचार केल्यास चीन कंडोमच्या बाजारपेठेत अग्रस्थानी आहे. चीनमध्ये वर्षाला सुमारे 5.8 अब्ज युनिट्सचा वापर होतो. या बाजारपेठेत भारत दुसऱ्या तर तुर्की तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2024 ते 2035 या काळात आशियाई कंडोम बाजारपेठ 3% वार्षिक दराने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चीन भारत आणि तुर्की या देशात जगात सर्वाधिक कंडोम वापरले जातात. 

नक्की वाचा - Weight Loss: वयाची 30 शी ओलांडल्यानंतर पोट का सुटते? त्या मागचे कारण ऐकून हैराण व्हाल

दादरा नगर हवेली हा भाग केंद्रशासित आहे. आकाराने हा लहान प्रदेश आहे. पण इथं सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत जागृता असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. लोकसंख्येचा बाबत भारताने चीनला कधीच मागे टाकले आहे. असं असलं तरी चीन सध्याच्या घडीला कंडोम वापरात जगात पहिल्या क्रमांकावर आहे हे नाकारता येणार नाही. येत्या काळात कंडोमच्या बाजारपेठेत वार्षिक 3% वाढ होण्याचा अंदाज आहे. 2024 ते 2035 या कालावधीत लोकांमध्ये जनजागृती अधिक वाढल्याने या उद्योगाची व्याप्ती वाढणार आहे. विशेषतः सुरक्षित आरोग्यासाठी तरुणांमध्ये कंडोमचा वापर वाढताना दिसत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Health News: कोणतं फळ खाल्ल्याने पोट साफ होतं? 'ही' पाच फळं खाण्याचा डॉक्टर देतात सल्ला