- चुकीच्या आहारपद्धतीमुळे बद्धकोष्ठता ही आजच्या जीवनशैलीत एक गंभीर समस्या बनली आहे
- फ्लोरिडातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. जोसेफ साल्हाब यांनी पचन सुधारण्यासाठी पाच महत्त्वाची फळे सुचवली आहेत
- कीवी, सफरचंद, पेर, बेरीज आणि येलो ड्रॅगन फ्रूट यांचा सेवन पोट साफ करण्यास आणि पचन सुधारण्यास उपयुक्त ठरतो
Fruits for Constipation: आजच्या धावपळीच्या युगात चुकीच्या आहारपद्धतीमुळे बद्धकोष्ठता (Constipation) ही एक गंभीर समस्या बनली आहे. पोट नीट साफ न झाल्यामुळे केवळ अस्वस्थता जाणवत नाही, तर गॅस, डोकेदुखी आणि थकवा यांसारखे त्रासही उद्भवतात. फ्लोरिडा येथील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. जोसेफ साल्हाब यांनी आतड्यांच्या आरोग्यासाठी आणि नैसर्गिकरित्या पोट साफ करण्यासाठी 5 महत्त्वाच्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.
नक्की वाचा - Weight Loss: वयाची 30 शी ओलांडल्यानंतर पोट का सुटते? त्या मागचे कारण ऐकून हैराण व्हाल
डॉ. साल्हाब यांच्या मते, कीवी हे फळ फायबर आणि व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे. दररोज सकाळी 2 कीवी खाल्ल्याने पचन सुलभ होते. तसेच, सफरचंदामध्ये असलेले 'पेक्टिन' नावाचे फायबर कोलनची हालचाल वेगवान करते. ज्यामुळे शौचास त्रास होत नाही. पिकाच्या काळात सफरचंदाचे सेवन पोटाच्या आरोग्यासाठी वरदान ठरते. त्यामुळे ही फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
पेर (Pear) मध्ये 'सॉर्बिटोल' नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक सारक (Laxative) म्हणून काम करतो. लहान मुलांच्या बद्धकोष्ठतेवर नाशपातीचा रस अत्यंत प्रभावी ठरतो. याशिवाय बेरीज आणि येलो ड्रॅगन फ्रूट यांसारखी फळे आंतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात. मात्र, या फळांसोबतच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि शारीरिक हालचाल करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
ही आहेत ती 5 फळे:
- 1. कीवी: सकाळी 2 कीवी खाल्ल्याने आतड्यांमधील खाण बाहेर पडण्यास मदत होते.
- 2. येलो ड्रॅगन फ्रूट: हे फळ चविष्ट असण्यासोबतच फायबरने भरपूर असते.
- 3. बेरीज: स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी रक्तातील विषारी घटक काढून पोट साफ ठेवतात.
- 4. सफरचंद: दररोज एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा दूर होऊ शकतो.
- 5. पेर: हे फळ नैसर्गिकरीत्या पोट साफ करण्यास मदत करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world